
Russia-Ukriane War: रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. आता हे युद्ध घातक वळणावर आले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी मोठा दावा केला आहे. रशियाने चेर्नोबिल येथील अणुभट्टीवर ड्रोनने हल्ला केल्याचे त्यांनी म्हटले आहे. परंतु रशियाचा ड्रोन अणुउर्जा भट्टीच्या कवचावर पडल्याचे युक्रेनने म्हटले आहे. मात्र, रशियन ड्रोन हल्ल्यानंतर प्लांटमधील रेडिएशनची पातळी सामान्य आहे. दरम्यान, यापूर्वी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी यापूर्वीच युक्रेनवर अणुहल्ला करण्याचा इशारा दिला होता.
झेलेन्स्की यांनी रशियाने केलेल्या या हल्ल्यास दहशतवादी हल्ला म्हटले आहे. आण्विक स्थळांना लक्ष्य करणे धोकादायक असल्याचे म्हटले. मात्र, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी हल्ल्याची पुष्टी केल्यानंतर अग्निसुरक्षा अधिकाऱ्यांनी आग आटोक्यात आणल्याचे सांगितले.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सोशल मीडिया साइट एक्सवर सांगितले की, गुरुवारी रात्री रशियाच्या ड्रोनने चेरनोबिलमधील अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवेने तातडीने उपाययोजना केली. त्यामुळे गळती रोखली गेली. उच्च-स्फोटक वॉरहेडसह रशियाकडून हा ड्रोन हल्ला झाला. रशियाकडून आतापर्यंत चौथ्या पॉवर युनिटवर हल्ला करण्यात आला.
युद्धादरम्यान युक्रेनमधील अणु प्रकल्पांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. अणु प्रकल्पांच्या सुरक्षेच्या जोखमीवर भर देताना निष्काळजीपणाला जागा नाही. आयएईएला नेहमीच हाय अलर्ट राहावे लागेल. चेरनोबिल घटना आणि झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्पाभोवती अलीकडे वाढलेल्या लष्करी हालचालींमुळे चिंता वाढली आहे. आमच्याकडे चेरनोबिल अणु साइटवर एक टीम आहे, जी परिस्थितीचा तपास करत आहे.
दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील युद्धाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडक संदेश अमेरिकेतून दिला आहे. भारत या प्रकरणी तटस्थ नसल्याचे त्यांनी सांगितले. व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी शांततेच्या बाजूने भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.