भारताला ज्याची भीती तेच घडले, रशियाची चीनला थेट अत्यंत मोठी ऑफर, भारताची साथ सोडून..

अमेरिकेने मोठा डाव टाकला असून भारतावरील टॅरिफ कमी करण्याच निर्णय घेतला. मात्र, हा टॅरिफ कमी करण्यामागे अत्यंत मोठे गणित असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. चीन आणि रशियातील जवळीकता चांगलीच वाढल्याचे बघायला मिळत आहे.

भारताला ज्याची भीती तेच घडले, रशियाची चीनला थेट अत्यंत मोठी ऑफर, भारताची साथ सोडून..
India Russia and China
| Updated on: Feb 08, 2026 | 8:22 AM

अमेरिकेच्या धोरणामुळे भारत आणि रशियातील संबंध तणावात आल्याचे बघायला मिळतंय. भारत हा रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावला. या टॅरिफनंतरही भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली. मात्र, अमेरिका भारतावर अनेक मोठे निर्बंध लावताना दिसली. भारताला थेट रशियाचे कपडे धुण्याचे मशिनही अमेरिकेने म्हटले. भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी, याकरिता भारतावर मोठा दबाव होता. मात्र, रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करणारा देश चीन आहे. मात्र, चीनवर कोणतीही कारवाई अमेरिकेकडून करण्यात आली नाही. अखेर मोठ्या तणावानंतर अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारताने सध्याच्या घडीला रशियाकडून तेल खरेदी बंद केल्याचा दावा अमेरिकेने केला. अमेरिकेमुळे भारत आणि रशियातील चांगले संबंध तणावात आली.

अमेरिका आणि भारतामधील वाढलेली जवळीकता यामुळे रशियानेही आपली भूमिका स्पष्ट ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. अमेरिकेने जरी भारतावरील टॅरिफ मागे घेण्याचा निर्णय घेतला असला तरीही त्यांची मोठी खेळी आहे. अमेरिकेचे स्पष्ट म्हणणे आहे की, भारताने व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करावी. इथेच अमेरिकेने गेम केला. व्हेनेझुएलाच्या तेलावर सध्या पूर्णपणे अमेरिकेचे नियंत्रण आहे.

शिवाय व्हेनेझुएलाच्या तेलाही भारतासारखा मोठा ग्राहक मिळतोय. भारत अमेरिकेच्या दबावामुळे व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करू शकतो, हे स्पष्ट झाल्यावर रशियानेही चीनकडे पाऊल वळवले. रॉयटर्सच्या मते, या आठवड्यात चीनला होणाऱ्या रशियन तेल निर्यातीवरील सवलतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. रशिया चीनला स्वस्तामध्ये आपले तेल उपलब्ध करून देत आहे.

जगातील सर्वात मोठा क्रूड खरेदीदार चीनकडून मागणी वाढवण्यासाठी रशिया किंमती कमी करत आहे. मात्र, हा भारतासाठी अत्यंत मोठा धक्का म्हणावा लागेल. कारण रशिया भारताला देखील आपले तेल अत्यंत कमी दरात विकत. जर भारताने खरोखरच रशियाकडून तेल खरेदी थांबवली तर चीन हा रशियाचा एकमेंव तेल खरेदीदार ठरेल. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल निर्यातदार रशिया आहे. यामध्ये चीनला अधिक फायदा होईल. यासोबतच रशिया आणि चीनमधील संबंधही अधिक चांगले होतील, ही भारतासाठी अत्यंत मोठी धोक्याची घंटा आहे. कारण वाईट काळात रशिया कायमच भारताच्या बाजूने उभा राहिला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us