Russia strikes on Ukraine: युक्रेनमध्ये हाहाकार, रशियाचा मोठा हल्ला, एकाचवेळी डागले 75 मिसाइल्स

Russia strikes on Ukraine: रशियाचा जोरदार पलटवार, एकाचवेळी युक्रेनच्या अनेक शहरांवर हल्ला

Russia strikes on Ukraine: युक्रेनमध्ये हाहाकार, रशियाचा मोठा हल्ला, एकाचवेळी डागले 75 मिसाइल्स
russia strikes in ukraine
| Updated on: Oct 10, 2022 | 4:40 PM

मुंबई: रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला (Russsia Attack on Ukraine) केला आहे. सोमवारी एकाचवेळी युक्रेनची अनेक शहरं रशियन मिसाइल स्ट्राइकने (Missile Strike) हादरली. नुकताच क्रिमिया आणि रशियाला जोडणारा एका पूल (Crimea to Russia)स्फोटामध्ये उडवून देण्यात आला. त्यानंतर रशियाकडून युक्रेनवर इतकी मोठी कारवाई करण्यात आली आहे.

मिसाइल स्ट्राइक म्हणजे प्रत्युत्तर

ब्रिजवर झालेल्या हल्ल्यासाठी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी यूक्रेनला जबाबदार धरलं होतं. आजच्या मिसाइल स्ट्राइककडे प्रत्युत्तर म्हणून पाहिलं जातय.

रशियाने किती मिसाइल डागले?

“युक्रेनवर मिसाइल हल्ला झालाय. देशातील अनेक शहरात हल्ला झाल्याची माहिती आहे” असे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं. नागरिकांना सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. रशियाने युक्रेनवर 75 मिसाइल्स डागले, असं कीवकडून सांगण्यात आलं.

कीवमध्ये किती वाजता हल्ला?

स्थानिक वेळेनुसार, सकाळी 8.15 च्या सुमारास कीवमध्ये स्फोटाचा मोठा आवाज झाला. स्फोटाच्या स्थळी अनेक रुग्णवाहिका जात होत्या, असं एएफपीच्या पत्रकाराने सांगितलं. सोमवारी सकाळी कीवमध्ये एकूण पाच स्फोटाचे आवाज ऐकू आले.

कीववर शेवटचा हल्ला कधी झाला होता?

युक्रेनच्या ऊर्जा इन्फ्रास्ट्रक्चरला टार्गेट करण्यात आलं. रशियाने याआधी 26 जूनला कीववर स्ट्राइक केला होता. क्रिमिया आणि रशियाला जोडणारा पूल स्फोटामध्ये उडवून देण्यात आला. त्यासाठी रशियाने युक्रेनला जबाबदार धरलं. तीन जणांचा यामध्ये मृत्यू झाला होता. रशियाने त्यानंतर लगेचच इतक्या मोठ्या प्रमाणात स्ट्राइक केला.