भारताच्या मदतीला धावला रशिया, थेट अत्यंत मोठी घोषणा, पुतिन यांचा निर्णय, जेवढे हवे तेवढे..

इराण आणि अमेरिका युद्धात रशिया अॅक्शन मोडवर आल्याचे बघायला मिळत आहे. चीनच्या दाैऱ्यानंतर रशियाचे अध्यक्ष भारताच्या दाैऱ्यावर येणार आहेत. यासोबतच या युद्धाच्या पार्श्वभूमीत रशियाकडून मोठी घोषणा करण्यात आली.

भारताच्या मदतीला धावला रशिया, थेट अत्यंत मोठी घोषणा, पुतिन यांचा निर्णय, जेवढे हवे तेवढे..
Russian President Vladimir Putin
| Updated on: Apr 16, 2026 | 9:59 AM

भारत आणि रशियाचे संबंध कायमच चांगले राहिलेत. हे संबंध आजपासून नाही तर अनेक शतकांपासूनचे आहेत. भारत आणि रशिया दोन्ही देश असे आहेत की, दोघेही एकमेकांच्या चांगल्या आणि वाईट काळात सोबत असतात. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर मोठा टॅरिफ अमेरिकेने लावला. तरीही भारताने रशियाकडून तेल खरेदी पूर्णपणे बंद केली नाही. भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांवर रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव यांनी मोठे विधान केले. हेच नाही तर संरक्षण, ऊर्जा सुरक्षा यावर त्यांनी स्पष्टपणे मत मांडले. भारताला जितके पाहिजे तितके कच्चे तेल देण्यास तयार असल्याचेही त्यांनी म्हटले. WION ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना राजदूत अलीपोव यांनी म्हटले की, भारत आणि रशियातील उच्चस्तरीय चर्चा कायमच सुरू राहिल.

2026 मध्ये सप्टेंबरमध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ब्रिक्स शिखर समेंलनात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारताच्या दाैऱ्यावर असतील. रशियाने ब्रिक्ससाठी भारताला पूर्णपणे समर्थन दिले. हेच नाही तर गेल्या वर्षीच पुतिन डिसेंबर महिन्यात भारताच्या दाैऱ्यावर होते. आता पुन्हा एकदा भारतात पुतिन यांचे स्वागत करण्याच्या तयारीला सुरूवात झाली. भारत आणि रशियातील संरक्षण संबंध कायमच चांगले राहिली आहेत.

या मुलाखतीमध्ये रशियाच्या दूतावासांनी स्पष्ट केले की, s-400 वायु रक्षा प्रणाली लवकरच भारतात दाखल होईल. इराण आणि अमेरिका युद्धात भारताप्रमाणेच रशियानेही आपली भूमिका स्पष्ट ठेवली. भारतात या युद्धादरम्यान तेलाचा तुटवडा निर्माण झाला. यादरम्यान रशिया भारताच्या मदतीला धावून आला. आता पुतिन यांच्या या भारत भेटीला महत्वप्राप्त झाले. भारत भेटीच्या अगोदर पुतिन चीनच्या दाैऱ्यावरही असणार आहेत. त्यानंतर ते सप्टेंबर महिन्यात भारत दाैऱ्यावर असणार आहेत.

पुतिन चीन दाैऱ्यावर जाणार म्हटल्यावर अनेकांनी भुवया उंचावल्या. पुतिन भारत दाैऱ्यावरही येणार आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात जगातील अनेक देश संकटात आहे. भारत आणि रशिया दोन्ही देश खंबीरपणे एकमेकांच्यासोबत उभे असल्याचे बघायला मिळत आहे. पुतिन भारत दाैऱ्यावर आल्यानंतर काही मोठ्या घोषमा करण्याची शक्यता आहे. पुतिन गेल्या वर्षी भारत दाैऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांनी आठ मंत्र्यांना आपल्यासोबत आणले होते आणि धडाधड करार केले होते.

Follow Us