शत्रूही करणार नाही असे काम चीनने केले, भारतासाठी रशिया थेट मैदानात, संयुक्त राष्ट्र महासभेत..

भारत आणि रशिया यांच्यात मैत्री नक्की काय आहे हे जगाने यापूर्वी अनेकदा बघितले. त्यातच आता रशियाने असे काही केले की, सगळ्यांनाच मिरच्या लागल्या. चीनचा तर नुसता थयथयाट बघायला मिळाला. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81 व्या सत्रातून मोठी माहिती पुढे येतंय.

शत्रूही करणार नाही असे काम चीनने केले, भारतासाठी रशिया थेट मैदानात, संयुक्त राष्ट्र महासभेत..
Vladimir Putin Narendra Modi Xi Jinping
| Updated on: Sep 27, 2026 | 10:45 AM

रशियाने पुन्हा एकदा भारतासाठी असे काही केले की, जग फक्त बघतच राहिले. पाकिस्तानसह चीनला जोरदार मिरच्या लागल्या आहेत. रशियाने भारतासोबत मैत्री नक्की काय आहे हे पुन्हा दाखवले. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81 व्या सत्रात संबोधित करत रशियाचे विदेश मंत्री सर्गेई लावरोव यांनी संयुक्त राष्ट्र परिषदेत भारताला स्थायी सदस्यता मिळण्यासाठी जोरदार समर्थन केले. लावरोव यांनी सुरक्षा परिषदेत आशिया, आफ्रिका आणि लॅटिन व्यापक प्रतिनिधित्व करण्यासाठी समर्थन करत होते. भारत आणि ब्राझीलचे जोरदार समर्थन रशियाने केले. लावरोव यांनी म्हटले की, आम्ही आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेचे प्रतिनिधित्व वाढवत आहोत. आपण भारत आणि ब्राझीलसारख्या देशांचे समर्थन करायला हवे. पण सुरक्षा परिषदेत या देशांना कोणत्याही अतिरिक्त जागा दिल्या जात नाहीत. जर्मनी आणि जपान पुढे सरकत आहेत.

रशियासोबतच जगातील अजून काही देश सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्याच्या दावेदारीत भारताचे थेट समर्थन करत आहेत. मॉरीशसचे विदेश मंत्री धनंजय रामफु यांनी म्हटले की, आम्ही सुरक्षा परिषदेत सुधारणांवर G4 आणि L69 चे समर्थन करत आहोत. आम्ही भारताची रचनात्मक भूमिका बघून UNSC मध्ये स्थायी सदस्यता यावर समर्थन पुन्हा देत आहोत.

पुर्तगालचे पंतप्रधान लुईस मोटेंनेग्रो यांनी देखील सुरक्षा परिषदेत भारत, ब्राझील आणि आफ्रिकेच्या स्थायी सदस्याची मागणी केली. हिल्डा हेने यांनी भारत, ब्राझील, जर्मनी आणि जपानचे समर्थन केले. जपानचे पंतप्रधान सानाए ताकाची यांनी तात्काळ जास्त वेळ न घेता या देशांना स्थायी सदस्य करावे,असे म्हटले. सध्याच्या स्थितीत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 5 स्थायी सदस्य देश आहेत.

त्यात चीन,फ्रांन्स, रशिया, अमेरिका आणि ब्रिटन आहेत.या देशांकडे वीटो पावर आहे. यासोबतच 10 अस्थायी देश यात आहेत. ज्यांचा कार्यकाल 2 वर्षांचा असतो. भारताच्या मागे कायमच रशिया राहतो. मग परिस्थिती कोणतीही असो. त्यातच आता भारताचे जोरदार समर्थन रशियाकडून करण्यात आले. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर मोठा टॅरिफ लागण्याची शक्यता आहे. भारताच्या स्थायी सदस्यासाठी चीनने विरोध केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us