AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणने थेट अमेरिकेला हादरवले, अमेरिकेची एक चूक जगाला पडणार महागात, भारतात..

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव हा पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यातच इराणकडून देण्यात आलेला युद्धविराम प्रस्ताव अमेरिकेने फेटाळला आहे. त्यानंतर थेट इराणने जे केले ते धक्कादायक आहे. इराणने होर्मुज खाडीत मोठे हल्ले केले.

इराणने थेट अमेरिकेला हादरवले, अमेरिकेची एक चूक जगाला पडणार महागात, भारतात..
Strait of Hormuz
| Updated on: Sep 27, 2026 | 8:53 AM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव पुन्हा वाढताना दिसत आहे. इराणने अमेरिकेला युद्धविरामसाठी तीन अटी ठेवणारा प्रस्ताव दिला. तुर्कीकडे हा प्रस्ताव त्यांनी पाठवला. जर तो प्रस्ताव अमेरिकेने मान्य केला तर सात दिवसात होर्मुज खाडी पूर्णपणे सुरक्षित करू असे इराणने स्पष्ट म्हटले. युद्धाचे संकट थांबणार होते. मात्र, अमेरिकेने या इराणच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली. इराणचा प्रस्ताव मान्य नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले, यासोबतच मोठी धमकी दिली. अमेरिकेच्या या भूमिकेनंतर इराणने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळून लावला आणि याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला. त्यानंतर इराणने तात्काळ स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये आपली लष्करी ताकद प्रदर्शित केली आहे.

इराणकडून काही जहाजांना टार्गेट करण्यात आले. अमेरिकेला हे इराणचे उत्तर होते. होर्मुज खाडीत तणाव प्रचंड वाढला आहे. अहवालांनुसार, तेहरानच्या ताज्या हल्ल्यात एका जहाजाला फटका बसला आहे. या हल्ल्यापूर्वी इराणने काही अटींच्या अधीन राहून होर्मुज खाडीत जहाजांच्या वाहतुकीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याचा आणि अमेरिकेसोबतचा संघर्ष संपवण्याचा प्रस्ताव मांडला होता.

पण तो प्रस्ताव डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळला. फक्त फेटाळलाच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी यासोबतच इराणला इशाला देखील दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर होर्मुज खाडीत मोठा हल्ला इराणने केला. होर्मुज खाडी भारतासाठीही महत्वाची आहे. होर्मुज खाडी अशांतता म्हणजे थेट भारतावर त्याचा परिणाम होतो. भारतात कच्चे तेल आणि एलपीजी गॅस होर्मुजच्या माध्यमातूनच भारतात दाखल होतात.

मिळालेल्या माहितीनुसार, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत क्षेपणास्त्र, ड्रोन आणि नौदलाशी संबंधित मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू केल्या आहेत. किमान चार वेळा इराणच्या क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे जहाजांना लक्ष्य करण्यात आले आहे. इराणने अगोदरच इशारा दिला की, अमेरिकेशी संबंध असलेल्या जहाजांना आता आम्ही टार्गेट करणार आहे. युद्ध थांबण्यासाठी जग प्रार्थना करत असताना तणाव हा अधिक वाढताना दिसत आहे.

Follow Us
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल