AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला आणखी एक मोठा धक्का, आता अमेरिका विसरा, सर्वात मोठी बातमी समोर

मोठी बातमी समोर येत आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेच्या संसदेमध्ये एक विधेयक सादर करण्यात आलं आहे, हे विधेयक मंजूर झाल्यास त्याचा मोठा फटका हा भारतीय लोकांना बसणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला आणखी एक मोठा धक्का, आता अमेरिका विसरा, सर्वात मोठी बातमी समोर
trumpImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 25, 2026 | 2:55 PM
Share

अमेरिकेकडून पुन्हा एकदा भारताला धक्का देण्याची तयारी सुरू झाली आहे. यामुळे लाखो भारतीयांच्या स्वप्नावर पाणी फिरण्याची शक्यता आहे. रिपब्लिकन पक्षाच्या खासदाराकडून एक बिल अमेरिकेच्या संसदेमध्ये सादर करण्यात आलं आहे. हे विधेयक संमत झाल्यास भारताला मोठा धक्का बसणार आहे. या विधेयकामुळे नोकरीच्या आधारावर मिळणाऱ्या ग्रीन कार्डच्या सध्या असलेल्या व्यवस्थेमध्ये मोठा बदल होणार आहे. जर या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं तर जे भारतीय नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांना मोठा धक्का बसणार आहे. ग्रीन कार्डवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अलबामाचे सिनेटर टॉमी टबरविले यांनी ‘अमेरिकन्स फर्स्ट इमिग्रेशन अ‍ॅक्ट’ नावाने हे विधेयक सादर केलं आहे.

यामध्ये नोकरीच्या आधावर देण्यात येणारी ग्रीन कार्डची सुविधा रद्द करून पॉइंट्सच्या आधावर ग्रीन कार्डची तरतूद करण्यात यावी असं या विधेयकामध्ये म्हटलं आहे. हे बिल मंजूर झाल्यास यापूर्वी ज्यांनी ग्रीन कार्डसाठी अर्ज केले आहेत, त्यांचे अर्ज देखील रद्द होण्याची शक्यता आहे. तशी तरदूतच या बिलाच्या मसुद्यामध्ये करण्यात आली आहे. हे बील मंजूर होण्यापूर्वी ज्यांचे ग्रीन कार्डसाठीचे अर्ज मंजूर झाले आहेत, त्यांना मात्र ग्रीन कार्ड मिळणार आहे.

दरम्यान हे बिल मंजूर झाल्यास नोकरीसाठी अमेरिकेत जाणं हे प्रचंड कठीण होणार आहे. याचा सर्वाधिक फटका हा भारताला बसणार आहे. कारण दरवर्षी लाखो भारतीय तरुण रोजगाराच्या शोधात अमेरिकेला स्थलांतर करतात. रोजगारासाठी अमेरिकेत येणं ही फार मोठी संधी असते, आज प्रत्येकाला अमेरिकेत यायचं आहे, परंतु ही आपली जबाबदारी आहे की, इथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी अमेरिकेच्या कायद्याचं आणि येथील नियमांचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे, त्यासाठीच हे नवं विधेयक सादर करण्यात आलं आहे, अशी माहिती यावेळी टॉमी टबरविले यांनी म्हटलं आहे. दरम्यान दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्याची देखील धमकी दिली आहे. रशियाकडून तेल खरेदीच्या पार्श्वभूमीवर ही धमकी देण्यात आली आहे.

Follow Us
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना