गोकुळ दूध संघात ‘चेअरमन की चोरमन?; नामनिर्देशित सदस्यांच्या मतदान हक्कावरून विवेकानंद पाटील आक्रमक!
कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघात नामनिर्देशित सदस्यांना मतदान अधिकार देण्यास तीव्र विरोध दर्शवत विवेकानंद पाटील यांनी शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन केले. निवडून आलेल्या अध्यक्षाची मागणी करत, नामनिर्देशित सदस्यांमुळे दूध उत्पादकांवर अन्याय होत असल्याचे पाटील यांनी नमूद केले. त्यांनी "चोरमन नको, चेअरमन हवा" अशी भूमिका घेतली आहे.
कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळातील नामनिर्देशित सदस्यांना मतदान अधिकार देण्याच्या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन सुरू आहे. विवेकानंद पाटील यांनी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून या आंदोलनात सहभाग घेत, नामनिर्देशित सदस्यांच्या मतदान हक्कास विरोध दर्शवला. पाटील यांनी स्पष्ट केले की, जर बंटी पाटलांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला बहुमत मिळाले, तर अध्यक्ष त्यांच्याच बहुमताचा असावा.
पाटील यांनी असा युक्तिवाद केला की, नामनिर्देशित सदस्यांना मतदानाचा अधिकार दिल्यास दूध उत्पादकांवर सरळ अन्याय होईल. ते म्हणाले की, हे नामनिर्देशित सदस्य मागल्या दारानं आत घुसणारे असून, निवडून आलेला अध्यक्ष हा चेअरमन असतो, तर नामनिर्देशित सदस्यांच्या माध्यमातून नेमला जाणारा अध्यक्ष हा चोरमन असतो. आम्हाला आमच्या हक्काचा चेअरमन हवा, अशी त्यांची भूमिका होती. शेतकऱ्यांच्या कष्टाचे दूध काढून लोणी काढण्याचा हा प्रयत्न असून, राज्यातील एका नाकारलेल्या मंत्र्याचा यामागे हात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
Published on: Nov 09, 2026 01:31 PM
गोकुळ दूध संघात ‘चेअरमन की चोरमन?’; नामनिर्देशित सदस्यांच्या मतदान...
सुनील तटकरे कुणाचेही होऊ शकत नाहीत; रामदास कदमांचा गंभीर आरोप....
पोहरादेवीत मनोज जरांगे पाटील नतमस्तक; बाबूसिंग महाराजांच्या भेटीने राज
महाराजांना आपल्या कृतीतून आनंद मिळायला हवा! राज ठाकरेंचं इतिहासाबाबत..

