AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुबईपासून पाकिस्तानपर्यंत आमदाराच्या घरच्या लग्नाची चर्चा, मुलगी शिवांगी आणि जावई करतो काय? पहिला फोटोसमोर

बिहारचे आमदार अनंत सिंह यांच्या कन्या शिवांगी सिंह यांच्या लग्नाची सध्या दुबईपासून पाकिस्तानपर्यंत चर्चा आहे. शिवांगी आणि जावई ऋषिकेश कुमार यांच्याबद्दल सर्वांना कुतूहल आहे. ऋषिकेश कुमार अमेरिकेत एमबीए करून नोकरी करत आहेत. पाटणा येथील शाही विवाह सोहळ्यात 4 लाख पाहुण्यांसाठी 150 प्रकारचे पदार्थ असतील, अशी चर्चा आहे.

दुबईपासून पाकिस्तानपर्यंत आमदाराच्या घरच्या लग्नाची चर्चा, मुलगी शिवांगी आणि जावई करतो काय? पहिला फोटोसमोर
Shivangi Singh Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 09, 2026 | 4:40 PM
Share

Anant Singh Daughter Shivangi Singh : भारतातील एका लग्नाची सध्या जगभर चर्चा सुरू आहे. दुबई, पाकिस्तानपासून अमेरिकेपर्यंत या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. बिहारच्या मोकामाचे आमदार आणि बाहुबली नेता अनंत सिंह यांची मुलगी शिवांगी सिंह हिचा विवाह चांगलाच चर्चेत आला आहे. 25 नोव्हेंबर रोजी हे लग्न पार पडणार आहे. पाटणा येथील नदवां गावात या लग्नाची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या शाही विवाह सोहळ्याकडे अख्ख्या देशाचंही लक्ष लागलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनंत सिंह यांच्या कन्येच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. दुबईपासून पाकिस्तानपर्यंत या लग्नाला पाहुणे येणार असल्याने लग्नाच्या चर्चेने अधिक जोर धरला आहे. मीडियापासून सोशल मीडियापर्यंत याच लग्नाची चर्चा सुरू आहे. याबरोबर एक कुतुहूलही सर्वांना लागलं आहे. ते म्हणजे शिवांगी काय करते? जावई ऋषिकेश कुमार काय करतो? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. शिवांगीचा पहिला फोटो समोर आल्यानंतर ही उत्सुकता अधिकच वाढली आहे.

कोण आहे शिवांगी सिंह?

आमदार अनंत सिंह आणि नीलम देवी यांची शिवांगी सिंह ही छोटी कन्या आहे. वडिलांप्रमाणेच तिचे भाऊ राजकारणात आहे. पण शिवांगी राजकारणापासून दूर आहे. तिचं इन्स्टाग्राम अकाउंट सुद्धा प्रायव्हेट आहे. तिच्या अकाऊंटला केवळ तिचे आईवडील आणि भाऊ बहीणच फॉलो करतात.

सोशल मीडियावर लग्नाची चर्चा सुरू आहे. शिवांगीचा होणारा नवरा काय करतो? अशी विचारणा होत आहे. त्यामुळे शिवांगीने स्वत: इन्स्टाग्राम हँडलवरून एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. ऋषिकेश कुमार यांनी शिक्षण पूर्ण केलं आहे. ते आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर आहेत, असं सांगतानाच माझ्या आयुष्याशी संबंधित निर्णय कुणाला सांगण्यासाठी मी बांधिल नाहीये, असं शिवांगीने स्पष्ट केलं.

ऋषिकेश कुमार काय करतात?

ऋषिकेश कुमार हे पटणा येथील बिहटाच्या कृष्णा नगरातील रहिवासी आहेत. ऋषिकेश यांचे वडील रणविजय सिंह हे सीआरपीएफ कमांडेंट होते. ऋषिकेश यांनी अमेरिकेच्या जॉर्जिया स्टेट यूनिव्हर्सिटीतून एमबीए केलं आहे. गेल्या 11 वर्षापासून ते अमेरिकेत नोकरी करत आहेत.

150 प्रकारचे पदार्थ

नदवां गावात लग्न सोहळा पार पडणार आहे. 10 एकर जमिनीवर हा विवाह सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी मंडप बांधण्याचं काम सुरू आहे. या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी 150 प्रकारचे पदार्थ ठेवण्यात आले आहेत. देश विदेशातून सुमारे 4 लाख पाहुणे लग्नाला येणार असल्याचा अंदाज आहे. या लग्न सोहळ्यात भोजपुरी आणि बॉलिवूडचे अभिनेते येणार आहेत. तसेच विविध पक्षाचे राजकीय नेतेही येणार आहेत.

Follow Us
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार..
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार पलटवार
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद....
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद पाटील म्हणाले, मी अपक्ष म्हणून उतरणार!
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ, चंद्रकांत..
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप!
दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उपाययोजना,
दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उपाययोजना, जनावरांसाठी 500 एकरांवर चारा लागवड
मला धमक्या येतात, म्हणुन काही... विवेकानंद पाटील यांचा एल्गार
Vivekanad Patil At Kolhapur : मला धमक्या येतात, म्हणुन काही... विवेकानंद पाटील यांचा एल्गार
गोकुळच्या षडयंत्रामागे दादांचा हात; विवेकानंद पाटलांचा रोख कोणाकडे?
Vivekanand Patil : गोकुळच्या षडयंत्रामागे पुण्याच्या दादांचा हात; विवेकानंद पाटलांचा रोख कोणाकडे?
गोकुळ दूध संघात ‘चेअरमन की चोरमन?’; नामनिर्देशित सदस्यांच्या मतदान...
गोकुळ दूध संघात ‘चेअरमन की चोरमन?; नामनिर्देशित सदस्यांच्या मतदान हक्कावरून विवेकानंद पाटील आक्रमक!
सुनील तटकरे कुणाचेही होऊ शकत नाहीत; रामदास कदमांचा गंभीर आरोप....
Ramdas Kadam Vs Sunil Tatkare : सुनील तटकरे कुणाचेही होऊ शकत नाहीत; रामदास कदमांचा गंभीर आरोप, औकातीत राहा, अन्यथा....
पोहरादेवीत मनोज जरांगे पाटील नतमस्तक; बाबूसिंग महाराजांच्या भेटीने राज
Manoj Jarange Patil : पोहरादेवीत मनोज जरांगे पाटील नतमस्तक; बाबूसिंग महाराजांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण!
महाराजांना आपल्या कृतीतून आनंद मिळायला हवा! राज ठाकरेंचं इतिहासाबाबत..
Raj Thackeray Speech : महाराजांना आपल्या कृतीतून आनंद मिळायला हवा! राज ठाकरेंचं इतिहासाबाबत परखड भाष्य; नेमकं काय म्हणाले?