BMC Ban Firecrakers: आगीच्या घटनानंतर BMC चा सर्वात मोठा निर्णय, फटाके घेण्याआधी बातमी वाचा
मुंबई आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (MDMA) 25 नोव्हेंबरपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात रॉकेट आणि आकाशात उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी घातली आहे.

BMC Ban Firecrakers: दिवाळीच्या उत्सवामुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर, मुंबईत आकाशात उडणाऱ्या फटाक्यांच्या (aerial fireworks) वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. केवळ रविवारीच आगीच्या १३७ घटनांची नोंद झाल्यानंतर, मुंबई आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (MDMA) २५ नोव्हेंबरपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात रॉकेट आणि तत्सम आकाशात उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी घातली आहे.
मुंबई शहरामध्ये दिवाळीच्या उत्सवामुळे आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुंबई शहरात फटाक्यांमुळे विविध भागात आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत.याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत आकाशात उडणाऱ्या फटाक्यांच्या (aerial fireworks) वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. केवळ रविवारीच आगीच्या 137 घटनांची नोंद झाल्यानंतर, मुंबई आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (MDMA) 25 नोव्हेंबरपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात रॉकेट आणि आकाशात उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी घातली आहे.
मुंबईत फटाक्यांबाबत सर्वात मोठा निर्णय
सोमवारी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आणि MDMA प्रमुख प्राजक्ता वर्मा-लवांगारे यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, रॉकेट किंवा आकाशात उडणारे फटाके घरांच्या छतावर, बाल्कनीत, खिडक्यांवर किंवा इतर ज्वलनशील पृष्ठभागांवर पडल्यास इमारतींना आग लागण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे या फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
ही बंदी BMC क्षेत्रातील सर्व सार्वजनिक आणि खाजगी जागांना लागू असेल. यामध्ये निवासी संकुले, गच्ची, छप्पर, बाल्कनी, अंगण, पार्किंगची जागा, झोपडपट्टी परिसर आणि इतर सर्व ठिकाणांचा समावेश आहे. या बंदीतून कोणतीही जागा वगळण्यात आलेली नाही. ही बंदी ९ नोव्हेंबरपासून सुरू होऊन 25 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत लागू राहील.
तसेच या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, रॉकेट आणि तत्सम आकाशात उडणाऱ्या फटाक्यांवर पूर्णपणे बंदी असली, तरी इतर फटाक्यांच्या वापराबाबत सध्याचे कायदे, सरकारी निर्देश आणि न्यायालयांचे आदेश लागू राहतील. सार्वजनिक सुरक्षा आणि आगीच्या घटना रोखण्याची तातडीची गरज लक्षात घेता, संबंधित विभागांना या निर्बंधांचा व्यापक प्रसार करण्याचे आणि त्यांची कठोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुंबई अग्निशमन दलाचे आवाहन
मुंबई शहर व उपनगरांमध्ये गेल्या २४ तासांत फटाक्यांमुळे १३७ पेक्षा अधिक आगीच्या घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी फटाके फोडताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन मुंबई अग्निशमन दलाने केले आहे. तसेच आग लागल्यास किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मुंबई अग्निशमन दलाच्या १०१ या क्रमांकावर तसेच ९०७६३३३१०१, ९०७६३३३१०२, ९०७६३३३१०३, ९०७६३३३१०४ आणि ९०७६३३३१०५ वर मुंबई अग्निशमन दलाशी संपर्क साधावा. किंवा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.
