AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russia Ukraine War : रशिया यूक्रेनवर अणुबॉम्ब टाकण्याची शक्यता? राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी यंत्रणेला केलं अलर्ट

जगाच्या इतिहासात कुठल्याच देशाने अशाप्रकारे उघडपणे अणु हल्ल्याची धमकी दिल्याची ही पहिलीच घटना आहे. महत्वाची बाब म्हणजे यूक्रेनवर हल्ला करण्यापूर्वी पुतिन यांनी आपल्या भाषणात जगातील सर्व देशांनाही धमकी दिली होती. जर कुणी दखल देण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याकडे हत्यार आहे. त्यामुळे रशियाचे मनसुबे स्पष्ट असून यूक्रेनसोबत सुरु असलेल्या त्यांचं युद्ध हे आण्विक युद्धात रुपांतरित होण्याची शक्यता आहे.

Russia Ukraine War : रशिया यूक्रेनवर अणुबॉम्ब टाकण्याची शक्यता? राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी यंत्रणेला केलं अलर्ट
ब्लादिमीर पुतिन, राष्ट्रपती, रशिया
sagar joshi
sagar joshi | Updated on: Feb 27, 2022 | 9:21 PM
Share

नवी दिल्ली : रशिया (Russia) आणि यूक्रेनमधील (Ukraine) युद्धाने आता भीषण स्वरुप घेतलं आहे. मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या या युद्धात मोठ्या जीवितहानीसह प्रचंड आर्थिक नुकसानही पाहायला मिळत आहे. अशावेळी संपूर्ण जगाला हादरवणारी एक बहातमी आता समोर आलीय. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी रशियन न्यूक्लियर डिटरन्स फोर्सला (Nuclear Deterrence Force) अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत. जगाच्या इतिहासात कुठल्याच देशाने अशाप्रकारे उघडपणे अणु हल्ल्याची धमकी दिल्याची ही पहिलीच घटना आहे. महत्वाची बाब म्हणजे यूक्रेनवर हल्ला करण्यापूर्वी पुतिन यांनी आपल्या भाषणात जगातील सर्व देशांनाही धमकी दिली होती. जर कुणी दखल देण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याकडे हत्यार आहे. त्यामुळे रशियाचे मनसुबे स्पष्ट असून यूक्रेनसोबत सुरु असलेल्या त्यांचं युद्ध हे आण्विक युद्धात रुपांतरित होण्याची शक्यता आहे.

यूक्रेनविरोधात युद्ध सुरु करण्यापूर्वी पुतिन यांनी जगाला उद्देशून रशिया हा जगातील सर्वात मोठ्या आण्विक ताकदीपैकी एक असल्याचं वक्तव्य केलं होतं. इतकंच नाही तर यात कुठलीही शंका नाही की ते दखल देतील आणि त्यांची हार होणार नाही. कोणताही देश आमच्यावर हल्ला करेल तर त्याला परिणान भोगावे लागतील, असा इशाराच पुतिन यांनी दिला होता. 1945 मधील दुसऱ्या महायुद्धानंतर आतापर्यंत कोणत्याही देशाने अण्वस्त्रांचा उपयोग केलेला नाही. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेनं जपानवर अणुबॉम्ब टाकला होता. त्याचे परिणाम अद्यापही पाहायला मिळत आहे. त्या हल्ल्यात 2 लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

ब्लादिमीर पुतिन यांचा जगाला इशारा

यूक्रेनच्या मुद्द्यावर आपण कुठल्याही परिणामांना सामोरं जाण्यास तयार असल्याचं वक्तव्य पुतिन यांनी केलं आहे. पुतिन यांनी एकप्रकारे यूक्रेनला मदत करणाऱ्या कोणत्याही पश्चिमी देशांना आण्विक हल्ल्याचा इशाराच दिला आहे. शुक्रवारी NATO च्या 30 देशांनी चर्चा केली. असं असताना पुतिन यांनी कोणत्याही देशानं रशियाला निशाणा बनवण्याचा प्रयत्न केला तर इतिहासात नोंद नसेल अशा परिणामांना सामोरं जावं लागेल असा निर्वाणीचा इशारा दिलाय.

उत्तर प्रदेश दौरा अर्धवट सोडून मोदी दिल्लीकडे रवाना

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या उत्तर प्रदेशचा दौरा अर्धवट सोडून तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत दाखल होताच पंतप्रधान मोदी युद्धाच्या मुद्द्यावर उच्चस्तरिय बैठक घेणार आहेत. रशिया आणि यूक्रेनमध्ये मागील चार दिवसांपासून भीषण युद्ध सुरु आहे. रशियन सैन्य यूक्रेनची राजधानी कीव शहरावर कब्जा करण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत. तर यूक्रेनच्या सैन्याकडूनही रशियाला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. रशियाने यूक्रेनच्या 471 सैनिकांना अटक केल्याचा दावा केलाय. त्याचबरोबर यूक्रेनमधील 975 सैन्य तळ उद्ध्वस्त केल्याचा दावाही रशियाकडून करण्यात आलाय.

इतर बातम्या :

रशिया-युक्रेन युद्धाचा भारतावर मोठा परिणाम, येत्या काळात पेट्रोल-डिझेलच्या दराचा भडका उडणार

Russia Ukraine War : युक्रेन-रशियाची ‘शांतता चर्चा’ अधांतरी, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा बेलारूसमध्ये चर्चेला नकार, आक्षेप काय?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली