Russia On Pakistan : रशियाला पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या बाबतीत उचलेलं पाऊल नाही पटलं, थेट नोंदवला निषेध

Russia On Pakistan : कधीकाळी हे दोन्ही देश एकमेकाचे चांगले मित्र होते. भारताविरोधात पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या तालिबानचा वापर केला होता. पण आता तालिबान आणि भारतामध्ये चांगले संबंध आहेत.

Russia On Pakistan : रशियाला पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या बाबतीत उचलेलं पाऊल नाही पटलं, थेट नोंदवला निषेध
Sharif-Putin
Image Credit source: getty images
| Updated on: Sep 24, 2026 | 5:58 PM

पाकिस्तानने सलग दुसऱ्यांदा अफगाणिस्तानवर एअर स्ट्राइक केला. गुरुवारी पाकिस्तानने अफगाणिस्तानातील 10 ठिकाणी हल्ला केला. पाकिस्तानी एअर फोर्सने हे हल्ले घडवून आणले. ड्रोन लाँच करण्यासाठी आणि ते ठेवण्यासाठी या जागेचा वापर केला जात होता. यातल्या काही ड्रोन्सचा वापर एकदिवस आधी पाकिस्तान विरुद्ध करण्यात आला होता, असा पाकिस्तानचा दावा आहे. काबूलने म्हटलं की, या हल्ल्यात चार सर्वसामान्य नागरिक मारले गेले. रशियाला पाकिस्तानची ही कृती पटलेली नाही. रशियाने पाकिस्तानच्या या हल्ल्यावर संयमित प्रतिक्रिया दिली आहे. पण रशियाने हल्ल्याचा मात्र निषेध केला आहे. अफगाणिस्तानातील रशियन दूतावासामधून हे स्टेटमेंट आलं आहे.

काबूलमधील रशियन दूतावासाने एकापाठोपाठ एक एक्सवर चार पोस्ट टाकल्या. अफगाणिस्तानच्या पूर्व प्रांतावर झालेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व जखमी झालेल्या नागरिकांची आम्हाला चिंता आहे असं रशियन दूतावासाने म्हटलं आहे. रशियाने कोणाचं नाव घेतलं नाही. पण दोन्ही बाजूंना संघर्ष टाळण्याचा आणि चर्चेने मतभेद सोडवण्याचा सल्ला दिला आहे. “पूर्व अफगाणिस्तानवर झालेल्या हल्ल्यातील जखमी नागरिकांबद्दल आम्ही चिंता व्यक्त करतो. पीडित कुटुंबांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी प्रार्थना करतो. आम्ही दोन्ही बाजूंना संघर्ष टाळण्याचा आणि चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यांच आवाहन करतो” असं रशियन दूतावासने म्हटलं आहे.

बदला घेणार

अफगाणिस्तानने या हल्ल्यानंतर बदला घेणार असं म्हटलं आहे. ही आक्रमकता आणि उल्लंघनाविरोधात योग्य उत्तर देऊ असं अफगाणिस्तान सरकारने म्हटलं आहे. पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या कंधार, पक्तिया आणि खोस्त प्रांतात घुसखोरी करुन बॉम्बफेक केली. यात चाक निष्पाप नागरिक मारले गेले. अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमीरातने या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे.

तालिबान आणि भारतामध्ये कसे संबंध?

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मध्ये संघर्ष होण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी सुद्धा बऱ्याचदा संघर्ष झाला आहे. कधीकाळी हे दोन्ही देश एकमेकाचे चांगले मित्र होते. भारताविरोधात पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या तालिबानचा वापर केला होता. पण आता तालिबान आणि भारतामध्ये चांगले संबंध आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us