जगातील एकाही देशाला जे जमले नाही ते भारताने करून दाखवले, पुतिन यांनी थेट सुनावले..

इराण आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव आहे. त्यामध्येच आता रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी अमेरिकेला मोठा धक्का दिला. त्यांनी थेट भारताची बाजू घेत अत्यंत मोठे विधान केले. पुतिन यांनी थेट अमेरिकेला टोला मारला.

जगातील एकाही देशाला जे जमले नाही ते भारताने करून दाखवले, पुतिन यांनी थेट सुनावले..
Russian President Vladimir Putin
| Updated on: Jun 05, 2026 | 8:10 AM

भारत आतापर्यंत एकाही देशापुढे झुकला नाही. आपली अर्थव्यवस्था अधिक कशी मजबूत होईल, याकरिता भारत प्रयत्न करतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भारतावर मोठा दबाव अमेरिकेचा आहे. व्यापार करार करण्याकरिताही त्यांच्याकडून दबाव टाकला जात आहे. यासोबतच भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर मोठा टॅरिफ लावला. मात्र, भारत कोणाच्याही दबावापुढे झुकला नाही आणि भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम होणार नाही, असे मोठे विधान रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी केले. त्यांनी हा संदेश फक्त भारतच नाही तर जगाला दिला. व्लादीमीर पुतिन यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, भारत आणि पंतप्रधान मोदींवर अमेरिकेचा दबाव निरर्थक आहे. अमेरिकेचा गेल्या काही महिन्यापासून मोठा दबाव भारतावर आहे. त्यामध्येच आता हे विधान पुतिन यांनी केले.

अमेरिकेने भारतावर ज्यावेळी दबाव टाकला त्यावेळी रशियाने भारताची साथ दिली. व्लादीमीर पुतिन आपल्या काही मंत्र्यांसह भारतात दाखल झाले आणि त्यांनी भारतासोबत मोठे करार केले. पुतिन यांनी म्हटले की, भारत हा एक स्वतंत्र परराष्ट्र धोरण असलेला देश आहे. तो कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही. पुतिन यांनी असेही म्हटले की, भारताला रशियापासून दूर ठेवण्यासाठी अमेरिका किंवा पाश्चात्य देशांनी केलेला दबाव व्यर्थ ठरतील.

पुढे बोलताना पुतिन यांनी म्हटले की, भारत आपल्या राष्ट्रीय हिताच्या आधारावर निर्णय घेतो. हीच भारताची अत्यंत मोठी ताकद आहे. पुतिन यांनी अमेरिकेला स्पष्ट संदेश दिला की, तुम्ही कितीही प्रयत्न करा रशिया आणि भारत कधीच दूर जाणार नाहीत. पुतिन यांनी पाकिस्तानबद्दलही मोठे विधान केले. त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमावादाबद्दल आपल्याला कल्पना असल्याचेही म्हटले.

पुतिन चीन आणि भारत यांच्यातील संबंध अधिक सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यावेळी पुतिन चीनच्या दाैऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील होते. तीन महाशक्तीसोबत आल्या होत्या. त्यानंतर अनेक देशांना मोठ्या मिरच्या लागल्या होत्या. त्यामध्येच आता भारत, चीन, पाकिस्तान आणि अमेरिकेबद्दल स्पष्टपणे बोलताना पुतिन दिसले.

Follow Us