भारताला ज्याची भीती तेच घडतंय, रशिया अमेरिकेत करार, व्लादिमीर पुतिन यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांना म्हटले…

भारत-अमेरिकेतील अनेक वर्षांचे चांगले संबंध तणावात असल्याचे बघायला मिळतंय. भारत-पाक युद्ध दोन्ही देशातील व्दिपक्षीय चर्चेनंतर थांबवण्यात आले. यामध्ये अमेरिकेची कोणतीही भूमिका नाही. आता पुतिन यांनी मोठे विधान डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल केले.

भारताला ज्याची भीती तेच घडतंय, रशिया अमेरिकेत करार, व्लादिमीर पुतिन यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांना म्हटले...
Vladimir Putin and Donald Trump
| Updated on: Oct 12, 2025 | 8:55 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नोबेल शांतता पुरस्कारासाठी दावा करताना दिसले. मात्र, अनेक प्रयत्नांनंतरही त्यांना हा पुरस्कार मिळाला नाही. यादरम्यान अनेक देशांनी डोनाल्ड ट्रम्प यांना हा पुरस्कार मिळावा, याकरिता समर्थनार्थ पोस्ट शेअर केल्या. मात्र, भारताने तटस्थ भूमिका घेतली. भारत-पाकिस्तान युद्ध रोखल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. मात्र, भारताने स्पष्ट केले की, भारत-पाक युद्ध दोन्ही देशातील व्दिपक्षीय चर्चेनंतर थांबवण्यात आले. यामध्ये अमेरिकेची कोणतीही भूमिका नाही. इस्त्रायलचे पंतप्रधान यांनी नोबेल शांतता पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांनाच मिळाला, याकरिता एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला होता. रशियाने देखील पुरस्कार जाहीर होण्याच्या काही तास अगोदर डोनाल्ड ट्रम्प यांना पुरस्कारासाठी पाठिंबा दिला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे आभार मानले आहेत. नुकताच मीडियासोबत बोलताना पुतिन यांनी म्हटले की, ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळाला नसला तरी त्यांचे कार्य दुर्लक्षित करता येणार नाही. त्यांच्या प्रयत्नांमुळे गाझामध्ये शांतता आली आणि जर ती कायम राहिली तर ती एक ऐतिहासिक घटना नक्कीच मानली जाईल. START कराराला पुढे चालू ठेवण्यास सहमती दिल्याबद्दल पुतिन यांनी ट्रम्प यांचे कौतुक केले.

ट्रम्प यांनी त्यांच्या प्रस्तावाला आधीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ट्रम्प वर्षानुवर्षे सुरू असलेल्या गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी सतत काम करत आहेत, असेही पुतिन यांनी म्हटले. पुतिन यांचे बोलणे ऐकून अनेकांना धक्का बसला. मागील काही दिवसांपासून पुतिन हे सतत डोनाल्ड ट्रम्प यांचे काैतुक करताना दिसत आहेत. मात्र, रशियामुळे भारताने अमेरिकेसोबत पंगा घेतला असतानाच या गोष्टी घडताना दिसत आहेत.

व्लादिमीर पुतिन यांच्या डोक्यात नेमके काय सुरू आहे हे जगाला कळू शकत नाहीये. दोन्ही नेत्यांची बैठक युक्रेन युद्धादरम्यान झाली. मात्र, मार्ग काही निघू शकला नाही. हेच नाही तर या बैठकीनंतर रशियाने थेट युक्रेनमधील अमेरिकन कंपनीवर मोठा हल्ला केला. आता पुतिन थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत जवळीकता वाढवताना दिसत आहेत.