चीन विरोधात अमेरिकेने फुंकले रणशिंग, गंभीर आरोप, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, चीनला जगावर…
डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरील टॅरिफची घोषणा केली आणि एकच खळबळ उडाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी थोडा नाही तर चीनवर 100 टक्के टॅरिफ लावला. हा टॅरिफ लावण्याचे थेट कारणही त्यांनी सांगून टाकले. डोनाल्ड ट्रम्पचा काय डाव आहे, यावर ते बोलले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा करत चीनवर तब्बल 100 टक्के टॅरिफ लावला. हा टॅरिफ लावण्यासोबतच त्यांनी काही गंभीर आरोपही केली. मागील काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प टॅरिफच्या धमक्या देताना दिसत आहेत. भारतावर 50 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावल्यानंतर भारताच्या बाजूने चीन उभा राहिला. आता चीनवर थेट कारवाई करत इतका मोठा टॅरिफ लावण्यात आला. या टॅरिफला चीन कशाप्रकारे उत्तर देतो, याकडे जगाच्या नजरा आहेत. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारत आणि चीनमधील जवळीकता अधिक वाढल्याचे बघायला मिळाले. दोन्ही देशांमध्ये महत्वाचे करार देखील झाले. चीन देखील अमेरिकेच्या विरोधात कडक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे.
अमेरिकेने चीनवर लावलेल्या टॅरिफची अंमलबजावणी 1 नोव्हेंबर 2025 पासून होईल. या टॅरिफचा परिणाम चीनच्या अनेक उद्योगांवर थेट होणार आहे.चीनने दुर्मिळ पृथ्वी खनिजांच्या निर्यातीवर वाढत्या निर्बंधांना प्रतिसाद म्हणून अमेरिकेने ही कारवाई केल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. चीनने दुर्मिळ पृथ्वी खनिजांची निर्यात बंद केली. यामुळे कोट्यावधींचे नुकसान अमेरिकेचे होत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, चीनला जगावर कब्जा करण्याची परवानगी देता येणार नाही. बऱ्याच दिवसांपासून ते जगावर राज्य करण्यासाठी योजना तयार करत आहेत. दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीवर बंदी घातली आणि तो खूप वाईट निर्णय आणि धक्कादायक निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी पुढे म्हटले की, अमेरिकेची एकाधिकारशाही स्थिती देखील आहे, जी चीनपेक्षा खूपच मजबूत आणि दूरगामी नक्कीच आहे.
असे असतानाही मी त्याचा कधीच वापर करण्याचा निर्णय घेतला नाही आणि असे करण्याचे कारण देखील माझ्याकडे नव्हते. त्यांनी पाठवलेले पत्र खूप मोठे आहे आणि त्यात प्रत्येक खनिजाचा तपशीलवार उल्लेख आहे. मात्र, अनेक खनिजे त्यांनी जगापासून लपून ठेवली आहेत. जी खनिजे अगोदर निर्यात केली जात होती, ती आता अजिबात निर्यात केली जात नाहीत आणि ती निर्यात करणे त्यांनी थांबले आहे. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, ते शी जिनपिंग याची भेट घेणार नाहीत.
