AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जग हादरलं! डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर लावला तब्बल इतके टक्के टॅरिफ, तज्ज्ञांची गंभीर इशारा, संपूर्ण..

US China Tariffs : डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच जगाला धक्का देणारा निर्णय घेतला. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर अत्यंत मोठा टॅरिफ लावला असून यामुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था एकमेकांपुढे आल्या आहेत. हेच नाही तर आता याचे परिणाम जगातील सर्व व्यापारपेठेंवर पडू शकतात.

जग हादरलं! डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर लावला तब्बल इतके टक्के टॅरिफ, तज्ज्ञांची गंभीर इशारा, संपूर्ण..
Donald Trump China Tariff
| Updated on: Oct 11, 2025 | 7:25 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच जगाला हादरवणारा निर्णय घेतला. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन विरोधात कडक भूमिका घेत थेट 1 नोव्हेंबर 2025 पासून चिनी आयातीवर तब्बल 100 टक्के अतिरिक्त टॅरिफ (कर) लावण्याचा निर्णय घेतला. याबद्दल घोषणा त्यांनी केली. यापेक्षाही खळबळजक म्हणजे आता तो चीनवर अगोदरचा कर आहे, तो तसाच राहणार असून त्यांच्या प्रत्येक वस्तूंवर आता अतिरिक्त 100 टक्के टॅरिफ लागणार आहे. भारत-चीन रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिका या दोन्ही देशांबद्दल सक्त भूमिका घेतला दिसली. भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी अगोदर घेतला. भारताच्यानंतर आता चीनवर 100 टक्के टॅरिफ लावण्यात आला. रशियाकडून जगातील सर्वात जास्त तेल खरेदी करणारा देश चीन आहे.

टॅरिफच्या मुद्द्यामुळे जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था एकमेकांच्या पुढे आल्याचे बघायला मिळतंय. तज्ज्ञांच्या मते यामुळे जगातील सर्व बाजारपेठांना याचा गंभीर परिणाम भोगावा लागू शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर एका पोस्टमध्ये चीनवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, चीनने व्यापाराबाबत असामान्य आक्रमक भूमिका स्वीकारली आहे आणि याचा परिणाम सर्व देशांवर होताना दिसत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर आरोप करत म्हटले, चीन हा जवळपास सर्वच उत्पादनांवर निर्यात निर्बंध लादण्याची योजना तयार करतोय. ज्यामुळे जागतिक बाजारपेठेत असंतुलन निर्माण होत आहे. त्यामुळेच आता त्यांच्या विरोधात देखील आम्ही तेवढेच कठोर पाऊल उचलत आहोत. यासोबतच त्यांनी स्पष्ट केले की, 1 नोव्हेंबर 2025 पासून चीनवर 100 टक्के टॅरिफ लागू होणार आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात नियोजित भेट ठरलेली होती.

अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर ही भेट रद्द होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. चीनने दुर्मिळ पृथ्वी घटकांच्या निर्यातीवरील नियंत्रणे वाढवली तेव्हा त्यांनी संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का दिला. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या निर्णयाचा चिनी तंत्रज्ञान कंपन्या, इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्या,संरक्षण उद्योगावर मोठा परिणाम होऊ शकतो. आता चीन या टॅरिफविरोधात काय भूमिका घेतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.