कोण आहे स्वीटी अख्तर? सौदी अरेबियाने दिली भयंकर शिक्षा, कुटुंबाने केला धक्कादायक खुलासा

switi akhtar : सौदी अरेबिया सरकारने स्वीटी अख्तरला भयंकर शिक्षा दिली आहे. सौदीमधील सरकारच्या निर्णयाची जगभर चर्चा होत आहे. यामुळे स्वीटी अख्तर देखील चर्चेत आली आहे.

कोण आहे स्वीटी अख्तर? सौदी अरेबियाने दिली भयंकर शिक्षा, कुटुंबाने केला धक्कादायक खुलासा
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 23, 2026 | 9:16 AM

बांगलादेशात राहणारी स्वीटी अख्तर ही सौदी अरेबियात कामाला गेली होती. ती मक्काच्या ग्रँड मशिदीत सफाईकर्मचारी म्हणून काम करत होती. बांगलादेशच्या स्वीटीला ऑगस्ट 2023 रोजी अटक करण्यात आली होती. तिला व्यभिचाराच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. परंतु स्वीटीच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेची माहिती दिली नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. आता सौदी अरेबियाच्या प्रशासनाच्या निर्णयावरून एकच खळबळ उडाली आहे.

बांगलादेशात राहणारी स्वीटी अख्तरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. आठवीत असताना तिचं लग्न लावण्यात आलं. परंतु पहिलं लग्न मोडलं. नंतर कुटुंबाच्या दबावामुळे दुसरं लग्न केलं. पण दुसरा नवरा देखील सोडून गेला. आर्थिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या स्वीटीने सौदी अरेबियात जाण्याचा निर्णय घेतला. परंतु काही महिन्यानंतरच्या घटनेने कुटुंबालाही मोठा हादरा बसला आहे.  इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, स्वीटीला सौदी अरेबियात व्याभिचाराच्या आरोपाअंतर्गत अटक करण्यात आली. स्वीटी आणि नाजरूल इस्लाम या दोन बांगलादेशी नागरिकांना 14 ऑक्टोबर रोजी सौदी अरेबियात फाशीच्या शिक्षेची घोषणा करण्यात आली. दोघांना अनैतिक संबंधाच्या आरोपाखाली ही क्रूर शिक्षा सुनावण्यात आली. परंतु स्वीटीच्या कुटुंबीयांना तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याची माहिती नव्हती.  तिच्या वडिलांनी स्वीटीशी 13 ऑक्टोबर रोजी शेवटचं बोलणं केलं. तिला फाशी देण्याआधीच्या एक दिवस आधी त्यांचं बोलणं झालं होतं. पण तिच्या कुटुंबीयांना शिक्षेची माहिती सोशल मीडियामार्फत मिळाली.

Loading...

आठवीत लग्न अन् दोनदा मोडला संसार 

स्वीटी अख्तर ही मध्य बांगलादेशच्या तंगाइल जिल्ह्यातील छावली गावात राहणारी होती. तिच्या वडिलांचं नाव फजल मिया आहे. तर आईचं नाव हे जोहोरा बेगम आहे. स्वीटीला चार बहिणी होत्या. त्यात स्वीटी सर्वात लहान होती. स्वीटीचं कुटुंब गरीब होतं. तिचे वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. स्वीटीचं लग्न आठवीत असताना झालं. परंतु लग्न मोडल्यानंतर पुन्हा माहेरी आली. तिच्या पदरात एक मुलगी होती. एक मुलगी असलेल्या स्वीटीला कुटुंबाच्या दबावामुळे दुसरं लग्न देखील करावं लागलं.  तिच्या वडिलांनी दुसऱ्या नवऱ्याला सौदीला पाठवण्यासाठी कर्ज काढलं होतं. परंतु तिकडे पोहोचल्यानंतर त्याने संपर्क साधणेच बंद केले.  सलग दुसऱ्या लग्नात अपयश,  9 वर्षीय मुलीच्या पालनपोषणाची जबाबदारी आणि कुटुंबाची हलाखीची परिस्थिती यामुळे तिने सौदीत जाऊन नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us