AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेशचा भारताला मोठा दणका, चीनने केला गेम, भारताच्या सीमेजवळच थेट..

भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावात आहेत. त्यातच बांगलादेश एका मागून एक मोठे धक्के भारताला देताना दिसत आहे. त्यातच बांगलादेशचे चीन प्रेम चांगलेच उतू जाताना दिसतंय. ज्याचा फटका भारताला बसताना दिसतोय.

बांगलादेशचा भारताला मोठा दणका, चीनने केला गेम, भारताच्या सीमेजवळच थेट..
Bangladesh india China
| Updated on: Oct 13, 2026 | 10:09 AM
Share

भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावात आहेत. त्यातच बांगलादेशचे चीन प्रेम उतू जात आहे. भारताला मोठा दणका देत चीनसोबत मोठा करार बांगलादेशने केला. मुहम्मद यूनुसच्या अंतरिम सरकारने भारताशी संबंध प्रोजेक्ट रद्द केला. त्यानंतर थेट आता चीनचा हात पकडला आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, बांगलादेशने आपल्या दक्षिण-पश्चिमी सीमेजवळील विस्तार आणि आधुनिकीकरणचे काम 335.78 मिलियन अमेरिकी डॉलरच्या करारावर चीनला देत सह्या केल्या. हा करार जून महिन्यात तारिक रहमान यांच्या बिजिंग दाैऱ्यादरम्यान फायनल झाला. पण घोषणा करणे बाकी आहे. हे भारतासाठी याकरिता महत्वाचे आहे, कारण भारतीय सीमेच्या 80 किलोमीटर दूरवरच हे बनणार आहे. ज्याचे काम अगोदर भारतालाच देण्यात आले होते. या प्रोजेक्टसाठी चीन सरकार आणि बांगलादेश यांच्यात करार झाला.

चीनकडून बांगलादेशला 2 टक्क्यांप्रमाणे व्याज देऊन कर्ज दिले जाणार आहे. हे कर्ज 20 वर्षात बांगलादेशला फेडावे लागेल. यासोबतच 5 वर्षांचा अतिरिक्त ग्रेस टाईमही देण्यात आला. या माध्यमातून बांगलादेश सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे बंदरावर नवीन कंटेनर टर्मिनल तयार करणार आहे. तिथे कार्गाे हैंडिलिंग यार्ड निर्माण केले जाईल. यामागील सर्वात मोठा उद्देश हा बंदरांची संख्या वाढवणे आहे.

बांगलादेशने भारताला झटका दिल्यानंतर चीनचा हात पकडला आहे. साधारणपणे एक वर्षापूर्वी ढाकाच्या अंतरिम सरकारने मोंगला पोर्टजवळील 110 एकर जमीन इंडियन इकोनॉमिक जोन प्रोजेक्ट रद्द केला. 2015 मध्ये व्दिपक्षीय संबंधांनंतर जमीन भारताला देण्यात आली होती. भारत सरकारने हिरानंदानी ग्रुपची कंपनी इविटाला हे काम दिले होते. मात्र, प्रकल्पाला उशीर होत असल्याचे कारण पुढे करत बांगलादेशाने हा करार रद्द केला.

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यानंतर भारत आणि बांगलादेशचे संबंध तणावात आहेत. बांगलादेश सतत शेख हसीना यांच्या प्रत्यर्पनाची मागणी केली जात आहे. भारताने यावर स्पष्ट केले की, कायदेशीर प्रक्रियेनंतर भारत यावर उत्तर देईल. त्यातच भारताविरोधात सातत्याने भूमिका घेताना बांगलादेश दिसत आहे.

Follow Us
शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज महत्त्वाची सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा