AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar NCP: बहुतांश जिल्हाध्यक्षांचा कल, मतदारसंघ पुनर्रचनेबाबत राष्ट्रवादी अनुकूल? मुंबईतील पदाधिकारी बैठकीत घडलं काय?

Sharad Pawar NCP on Delimitation And Women Reservation Bill 2026: संसदेचे चार दिवसीय विशेष अधिवेशन बोलावल्यानंतर देशासह राज्यातही मोठ्या घडामोडी घडत आहे. शरद पवार हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर गुरुवारी पदाधिकारी बैठक झाली. त्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे.

Sharad Pawar NCP: बहुतांश जिल्हाध्यक्षांचा कल, मतदारसंघ पुनर्रचनेबाबत राष्ट्रवादी अनुकूल? मुंबईतील पदाधिकारी बैठकीत घडलं काय?
बहुतांश जिल्हाध्यक्षांचा कल, मतदारसंघ पुनर्रचनेबाबत राष्ट्रवादी अनुकूल?
| Updated on: Nov 27, 2026 | 10:13 AM
Share

सुनील काळे, प्रतिनिधी, टीव्ही 9, मराठी : मतदारसंघ पुनर्रचनेसह आणि महिला आरक्षण विधेयकाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. नवी दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. या महिन्याच्या अखेरीस संसदेचे चार दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. त्यात हे विधेयक मांडून मंजूर करण्याची शक्यता आहे. राज्यातही त्याअनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे. गुरुवारी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, जिल्हाध्यक्षांची बैठक झाली. या बैठकीतून एक मोठी बातमी समोर येत आहे.

जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी अनुकूल

डिलिमीटेशन विधेयकावर शरद पवार घेतील ती भूमिका मान्य असेल असे मत राष्ट्रवादीच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी मांडल्याचे समोर येत आहे. विधेयकावर पक्षाच्या भूमिकेला पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा राहिल असं मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत नेतृत्वाने निर्णय घेतल्यास जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी अनुकूल असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

पदाधिकाऱ्यांचं मत काय?

गुरुवारी राज्यातील विविध विभागातील जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी वाय. बी. चव्हाण सेंटर येथे बैठकीसाठी आले होते. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. यावेळी अनेक मतदारसंघांमध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने मतदारासंघाचं विभाजन होणं गरजेचं असल्याचं मत काही जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. या विधेयकाबाबत घाईघाईने भूमिका न घेता सर्व बाबींचा विचार करण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाचा सखोल अभ्यास करून, त्यातील तरतुदी आणि संभाव्य परिणाम तपासल्यानंतरच पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर करण्यात येईल असे वरिष्ठांनी आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जयंत पाटील यांच्या ट्विटची चर्चा

जयंत पाटील यांनी या सर्व घाडमोडींदरम्यान एक ट्विट केले आहे. मुंबई मेट्रोच्या ॲक्वा लाईनने ग्रँट रोड ते मरोळ नाका असा प्रवास केला. काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळा तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी मुंबईचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्विकारली होती. त्यावेळी मुंबई शहरातील वाहतुक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी एलिव्हेटेड मेट्रोचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आला होता.

मात्र दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक हेरिटेज वास्तूंचे जतन व्हावे, तसेच मंत्रालय, विधानभवन आणि अनेक शासकीय, खासगी कार्यालयांमुळे सतत वर्दळ असलेल्या या भागात मेट्रो भूमिगत असावी, अशी माझी आग्रही भूमिका होती. पुढे मंत्रिमंडळाने भूमिगत मेट्रोच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. आज या भूमिगत मेट्रोतून प्रवास करताना मुंबईकरांचा प्रवास कोणत्याही अडथळ्याविना जलद आणि सुकर होत आहे, याचे समाधान वाटले. शहराचा वारसा जपत शाश्वत विकास साधणे, हीच खरी प्रगती आहे, असे ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे.

Follow Us
डिलिमिटेशन विधेयकात महिला आरक्षणाचा मुद्दा दिशाभूल करणारा....
Natasha Awhad : डिलिमिटेशन विधेयकात महिला आरक्षणाचा मुद्दा दिशाभूल करणारा; नताशा आव्हाड असं का म्हणाल्या?
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर