AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kokan: गणपतीपुळेच्या अगदी जवळ आहे निसर्गाचा हा शांत कोपरा; पर्यटकांना अजूनही फारशी माहिती नाही

Kokan: कोकणात फिरायला जायचं म्हटलं की अनेकांच्या यादीत गणपतीपुळे, तारकर्ली आणि मालवण या ठिकाणांचा समावेश असतो. मात्र, गणपतीपुळेपासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर असलेला हा बीच अजूनही अनेक पर्यटकांसाठी अपरिचित आहे.

| Updated on: Nov 27, 2026 | 10:04 AM
Share
Kokan: महाराष्ट्राला निसर्गसौंदर्याचं भरभरून वरदान लाभलं आहे. विशेषत: कोकणातील समुद्रकिनारे, नारळी-पोफळीच्या बागा, हिरवेगार डोंगर आणि निसर्गरम्य गावं पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. सुट्टीच्या दिवशी समुद्रकिनाऱ्यावर निवांत वेळ घालवायचा असेल तर अनेकजण गणपतीपुळे किंवा तारकर्लीला जाण्याचा प्लॅन करतात. मात्र, या लोकप्रिय पर्यटनस्थळांच्या अगदी जवळ अशी काही ठिकाणं आहेत, जिथे निसर्गाचा शांत अनुभव घेता येतो.

1 / 7
असंच एक सुंदर ठिकाण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील भंडारपुळे बीच. गणपतीपुळेपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेला हा समुद्रकिनारा निसर्गप्रेमींसाठी खास आकर्षण ठरतो. भंडारपुळे बीचचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथलं शांत आणि निसर्गरम्य वातावरण. एका बाजूला अथांग अरबी समुद्र, तर दुसऱ्या बाजूला हिरवीगार डोंगररांग आणि नारळ-सुपारीच्या बागा असं सुंदर दृश्य इथे पाहायला मिळतं.

2 / 7
किनाऱ्यावरची सोनेरी वाळू, समुद्राच्या लाटांचा आवाज आणि थंडगार वारा यामुळे इथं आल्यावर शहरातील धावपळीचा विसर पडतो. गणपतीपुळ्याच्या तुलनेत या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची वर्दळ कमी असते. त्यामुळे शांतपणे समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी, फोटोग्राफी करण्यासाठी किंवा निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.

3 / 7
विशेषतः सूर्यास्ताच्या वेळी समुद्रावर पसरणारी सोनेरी किरणं पाहण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरतो. भंडारपुळे बीचला भेट देण्याचा आणखी एक फायदा म्हणजे जवळच असलेलं प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिर. गणपतीपुळे इथलं स्वयंभू गणेश मंदिराला सुमारे 400 वर्षांची परंपरा असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे गणपतीचं दर्शन आणि त्यानंतर भंडारपुळे बीचवर निवांत वेळ घालवण्याचा प्लॅन करता येतो.

4 / 7
याशिवाय कवी केशवसुत यांचं जन्मगाव मालगुंड आणि जयगड किल्ला ही परिसरातील अन्य आकर्षणंही पाहता येतात. भंडारपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळ आहे. मुंबई किंवा पुण्याहून स्वतःच्या वाहनाने गणपतीपुळ्याच्या दिशेने प्रवास करून पुढे भंडारपुळे गाठता येतं.

5 / 7
गणपतीपुळेपासून हे ठिकाण रस्त्याने अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर आहे. रेल्वेने जायचं असल्यास रत्नागिरी हे जवळचं प्रमुख रेल्वे स्थानक आहे. तिथून टॅक्सी किंवा अन्य स्थानिक वाहनांनी गणपतीपुळे आणि पुढे भंडारपुळे गाठता येतं. ऑक्टोबर ते मार्च हा काळ भंडारपुळे बीचला भेट देण्यासाठी उत्तम मानला जातो. या काळात हवामान आल्हाददायक असल्याने समुद्रकिनाऱ्यावर फिरण्याचा आनंद घेता येतो.

6 / 7
पावसाळ्यात हा परिसर हिरवागार होतो. मात्र समुद्राला उधाण असल्याने पाण्यात उतरणं टाळावं. समुद्रातील प्रवाह आणि लाटांचा अंदाज घेऊन स्थानिकांच्या सूचनांचं पालन करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे यंदाच्या सुट्टीत नेहमीच्या पर्यटनस्थळांऐवजी कोकणातील या शांत समुद्रकिनाऱ्याला नक्की भेट देण्याचा विचार करा.

7 / 7
Follow Us
डिलिमिटेशन विधेयकात महिला आरक्षणाचा मुद्दा दिशाभूल करणारा....
Natasha Awhad : डिलिमिटेशन विधेयकात महिला आरक्षणाचा मुद्दा दिशाभूल करणारा; नताशा आव्हाड असं का म्हणाल्या?
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर