AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोलापूर बँकेच्या निवडणुकीचा पहिला निकाल हाती; मंत्री जयकुमार गोरे यांना मोठा धक्का, नेमकं काय घडलं?

सोलापूर बँकेच्या निवडणुकीचा पहिला निकाल हाती लागलाय. पहिल्याच निकालात मंत्री जयकुमार गोरे यांना मोठा धक्का बसला आहे.

सोलापूर बँकेच्या निवडणुकीचा पहिला निकाल हाती; मंत्री जयकुमार गोरे यांना मोठा धक्का, नेमकं काय घडलं?
Breaking News
| Edited By: | Updated on: Nov 27, 2026 | 10:18 AM
Share

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 9 जागांवरील मतमोजणीला सुरूवात झाली आहे. या बँकेच्या निवडणुकीसाठी 86.94 टक्के मतदान झालं. या निवडणुकीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे हे समोरासमोर आले आहेत. या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. त्यात मोहिते पाटील गटाचा उमेदवार विजयी झाला आहे. मोहिते पाटील गटाच्या उमेदवारांच्या विजयाने मंत्री जयकुमार गोरे यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर डीसीसी बँकेचा पहिला निकाल हाती लागलाय. सोलापूर DCC बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचे उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील विजयी झाले आहेत. तर दुसऱ्या निकालात भाजपने बाजी मारली आहे. दुसऱ्या निकालात भाजप प्रणित पॅनलचे उमेदवार बाबासाहेब देशमुख विजयी झाले आहेत. बाबासाहेब देशमुख हे सांगोल्याचे शेकापचे आमदार आहेत. ते भाजप प्रणित सहकार विकास पॅनलमधून विजयी झाले आहेत. त्यांनी मोहिते पाटील पॅनलचे संजय इंगोले यांचा पराभव केला आहे.

विजयी उमेदवाराने मानले मतदारांचे आभार 

विजयी उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील म्हणाले, माझा विजय हा माळशिरसच्या जनतेला सुपूर्द करतो. मनापासून सर्व मतदारांचे आभार मानतो. माळसिरस तालुका म्हटलं तर, विजयसिंह यांच्या विचाराने हा तालुका चालला आहे. सातत्याने हा तालुका सुखदुखाच्या काळात उभा राहिलेला आहे. त्यात खात्री होती की, मतदार आम्हाला विजयी करतील’.

मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप

दरम्यान, सोलापूर जिल्हा बँकेच्या मतमोजणीत प्रक्रियेत आक्षेप देखील घेतल्याचे समोर आलं आहे. मोहिते पाटील गटाने मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेतला. मतमोजणी प्रक्रियेत 1 मतपत्रिका कमी असल्याचा आक्षेप घेतला आहे. दुग्ध प्रक्रिया मतदारसंघात आक्षेप घेतला आहे. या मतमोजणी प्रक्रियेत त्यांनी आक्षेप घेतला आहे.

सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदारांनी गुरुवारी मतदानाचा हक्क बजावला. खरंतर मतमोजणीच्या पद्धतीवरून मोहिते पाटील आणि पालकमंत्री गोरे हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी एकत्रित मतमोजणी करण्याची मागणी केली होती. तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तालुकानिहाय मोजणी करण्याची मागणी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे केली होती.

Follow Us
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट; प्रकृती स्थिर, डॉक्टरांचा....
Sharad Pawar Health Update : शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट; प्रकृती स्थिर, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला
डिलिमिटेशन विधेयकात महिला आरक्षणाचा मुद्दा दिशाभूल करणारा....
Natasha Awhad : डिलिमिटेशन विधेयकात महिला आरक्षणाचा मुद्दा दिशाभूल करणारा; नताशा आव्हाड असं का म्हणाल्या?
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!