Gold Big Crash : 72000 रुपयांनी सोन्याच्या भावात मोठी घसरण, 1980 नंतर पहिल्यांचा धाड.. धाड.. कोसळले सोने, पुढे..
Gold Silver Price : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या भावात मोठा बदल होताना दिसत आहे. त्यातच सोने 1 लाखाच्या खाली जाईल, असा अंदाज आहे. तज्ज्ञांकडून मोठा सल्ला सोने खरेदीकरिता दिला जात आहे.

मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण होत आहे. 2 लाखापर्यंत पोहोचलेले सोने थेट 1 लाख 27 हजारांपेक्षा घसरले. पुढील काही दिवसात सोन्याचे दर 1 लाखाच्याखाली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामध्येच आता मोठी माहिती MCX रिपोर्टमध्ये आली. इराण आणि अमेरिका युद्धात सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली. सोने त्याच्या निचांकाला पोहोचताना दिसत आहे. मागील 10 महिन्यात सोने प्रचंड स्वस्त झाले. The Kobeissi Letter च्या डाटामध्ये सोन्याबद्दल खुलासा झाला. सोने कोसळण्याचे कारण अमेरिका असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेत मोठी महागाई झाली आहे. 200 दिवसात सोन्याचा भाव 20 टक्क्यांनी खाली आला. जून 2013 मध्ये सर्वात जास्त सोने कोसळले होते. 13 वर्षातील ही सर्वात मोठी घसरण असल्याचे सांगितले जात आहे.
यापूर्वी 13 वर्षापूर्वी अशी घसरण सोन्याच्या भावात नोंदवण्यात आली होती. 1980 नंतर सोन्यात इतकी मोठी घसरण बघायला मिळाली नाही. इतिहासातील सर्वात मोठ्या घसरणीकडे सोने वाटचाल करत आहे. 200 दिवसात सोने 20 टक्क्यांनी घसरले. जागतिक पातळीवर होणाऱ्या गोष्टींचा परिणाम होण्याच्या भावावर होतो. 72000 रूपये प्रति 10 ग्रॅमने सोने स्वस्त झाले.
चांदी देखील 2.75 लाख रूपये प्रति किलो स्वस्त झाली. सोने आपल्या उच्चांकापेक्षा तब्बल 37 टक्क्यांनी घसरले. 1980 नंतर कधीच सोन्यात इतकी मोठी घसरण बघायला मिळाली नाही. पुढील काही दिवसात सोन्याच्या भावात यापेक्षा अधिक घसरण अपेक्षित आहे. भारतात सोने खरेदी अजून लोकांनी मोठ्या प्रमाणात केली नाही. सर्वजण सोने 1 लाखाच्या आत जाण्याची वाट पाहात आहेत.
ऐनदिवाळीच्या तोंडावरही सोने स्वस्त झाले होते. आता देशात लग्नसराई आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोने खरेदी झाले आहे. आता लोकांकडून सोन्याची मोठी खरेदी केली जाऊ शकते. सोन्यासोबतच चांदीही मान टाकून देताना दिसत आहे. काल सोन्याच्या भावात थोडी वाढ झाली. परवा सोन्याचा भाव कोसळताना दिसला. सोने 1 लाखापेक्षा खाली जाईल, असा अंदाज आहे. भारतात दरवर्षी मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात होते. सोन्याकरिता देश इतर देशांवर अवलंबून आहे.
