डोनाल्ड ट्रम्प यांना पहिला सर्वात मोठा धक्का, त्या अहवालाने जगात खळबळ, आता थेट..

Donald Trump Award : डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतील, याचा अजिबातच भरोसा नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला धक्का देत भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. भारतासोबतच रशियाला देखील मोठा धमक्या देण्याचे काम अमेरिकेकडून सुरू आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना पहिला सर्वात मोठा धक्का, त्या अहवालाने जगात खळबळ, आता थेट..
Donald Trump
| Updated on: Sep 25, 2025 | 1:03 PM

डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून टीकेचे धनी ठरले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावून सर्वांना मोठा धक्का दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारत, रशिया आणि चीन एकाच मंचावर आले. अमेरिकेच्या दादागिरी विरोधात अनेक देश हे थेट भूमिका घेताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून दावा करत आहेत, त्यांच्यामुळेच भारत आणि पाकिस्तान युद्ध थांबले. त्यांनी मध्यस्थी केली नसती तर जगातील सर्वात मोठे युद्ध जगाला भारत आणि पाकिस्तानच्या माध्यमातून भोगावे लागले असते. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नोबेल पुरस्कारावर दावा केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करताना दावा केला की, ते नोबेल शांती पुरस्काराचे पूर्णपणे हक्कदार आहेत. त्यांनी दावा केला की, भारत-पाकिस्तानसह त्यांनी जगातील सात युद्ध थांबवली आहेत. त्यामुळेच त्यांना शांतीचा नोबेल पुरस्कार हा मिळाला पाहिजे. मात्र, आता डोनाल्ड ट्रम्प यांचे हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता फार जास्त कमी आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळू नये, असे अमेरिकेतील लोकांनाच वाटते.

नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्काराच्या मागणीसंदर्भात अमेरिकेत एक सर्वे करण्यात आला. त्यामध्ये जास्त करून अमेरिकेतील लोकांनी डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्यास विरोध दर्शवला आहे. 49 टक्के लोकांना वाटते की, डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे. मात्र, त्यापेक्षा जास्त म्हणजेच 51 टक्के लोकांना स्पष्टपणे वाटते की, डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळाला नाही पाहिजे.

व्हाईट हाऊसचे प्रवक्ता एना केली यांनी म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबतचे सर्वात मोठे सर्वेक्षण आहे की, त्यांनी जगातील अनेक युद्ध संपवून हजारो लोकांचे जीव वाचवले आहेत. मुळात म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे नोबेल पुरस्कारपेक्षाही जास्त पुढे आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना लोकांना मारले जाण्यापेक्षाही अधिक लोकांना कसे वाचवता येईल, याची चिंता अधिक आहे.