AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानला मोठा धक्का, पाकिस्तानच्या गुप्तचर आणि संरक्षण बजेटवर आता थेट अमेरिकेचे…

डोनाल्ड ट्रम्प सध्या जगात खळबळ माजवत आहेत. डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतील, याचा अजिबात नेम नाहीये. डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानची वाढती जवळीकता सर्वांसाठी डोकेदुखी ठरलेली असतानाच हा धक्का त्यांनी दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानला मोठा धक्का, पाकिस्तानच्या गुप्तचर आणि संरक्षण बजेटवर आता थेट अमेरिकेचे...
Donald Trump
| Updated on: Sep 22, 2025 | 9:54 AM
Share

पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये मोठा हल्ला केला. यामध्ये अनेक पर्यटकांना आपले जीव गमावावी लागली. हेच नाही तर कुटुंबियांसमोर थेट गोळ्या दहशतवाद्यांनी घातल्या. या धक्कादायक घटनेचे अनेक व्हिडीओ देखील पुढे आली. त्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले आणि त्यांचे कंबरडे मोडले. पाकिस्तान आपल्या संरक्षण बजेटमधून महत्वाचा भाग हा दहशतवाद्यांना देतो हे जगजाहीर आहे. आता जागतिक समुदाय पाकिस्तानच्या डावपेचांवर लक्ष ठेऊन आहे. आता ट्रम्प प्रशासनाच्या अमेरिकन परराष्ट्र विभागाने पाकिस्तानला त्यांचे संरक्षण आणि गुप्तचर बजेट संसदीय किंवा नागरी सरकारच्या देखरेखीखाली ठेवण्याचे थेट निर्देश दिले आहेत. यामुळे आता पाकिस्तानला मोठा फटका बसला असून त्यांचा बुरखा फाडला जाणार हे स्पष्ट आहे.

पाकिस्तान आपल्या संरक्षण बजेटमधून मोठा हिस्सा थेट दहशतवाद्यांना देतो आणि त्यामुळे त्यांना मोठे बळ भारताविरोधात दहशतवादी हल्ले करण्यासाठी मिळते. हेच आता अमेरिकेने रोखणाचा निर्णय घेतलाय. वृत्तानुसार, वॉशिंग्टनने आर्थिक जबाबदारी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी इस्लामाबादला थेट अशाप्रकारे निर्णय घेण्यास सांगितले. यानुसार, आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या 2025 च्या आर्थिक पारदर्शकता अहवालात समाविष्ट आहेत.

पाकिस्तानसमोर मोठी समस्या उभी असून दहशतवाद्यांना नेमका पैसा द्यायचा तरी कसा? अमेरिकन सरकारचे हे वार्षिक मूल्यांकन विविध सरकारांच्या अर्थसंकल्पीय आढावा घेते, सार्वजनिक पैशाचे व्यवस्थापन, प्रकाशन, लेखापरीक्षण आणि खर्च कसे करतात यावर लक्ष केंद्रित करते. अमेरिकेने दिलेल्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानमधील काही मंत्री देखील तणावात असल्याचे बोलले जात आहे. कारण पाकिस्तानच्या बजेटमधून लष्करापेक्षाही मोठा हिस्सा दहशतवाद्यांसाठी काढला जातो.

पाकिस्तानमधील लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेच्या बजेटवर संसदीय किंवा नागरी सार्वजनिक देखरेख नव्हती, असे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे आता अमेरिकेने पाकिस्तानला चांगलाच मोठा झटका दिला आहे. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानने अमेरिकेसोबत जवळीकता साधलीये. भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात असताना पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांचे अमेरिकेचे दाैरे हे अधिक वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Follow Us
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...