होर्मुजच्या पाण्यावर तरंगतायत आयफोन्स, होर्मुज खाडीत भयंकर स्फोट, धक्कादायक व्हिडीओ..
होर्मुज खाडीत धक्कादायक घटना घडली. दुबईहून निघालेल्या जहाजाचा मोठा स्फोट झाला. हे जहाज माईनला धडकल्याने हा स्फोट झाल्याचे कळतंय. त्यातच हे जहाज बुडाल्यानंतर आयफोनचे बॉक्स तरंगताना दिसत आहेत.

होर्मुजमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव बघायला मिळत आहे. सतत जहाजांवर हल्ले केले जात आहेत. इराण आणि अमेरिका युद्ध भडकल्यानंतर इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने तेल पुरवठा विस्कळीत झाला. हेच नाही तर होर्मुज खाडी युद्धाचे मैदान बनले. होर्मुज खाडीतून जाणाऱ्या जहाजांवर मोठे हल्ले करण्यात आले. त्यात होर्मुज खाडीतील धक्कादायक व्हिडीओ पुढे आला. होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये आयफोन आणि महागड्या अत्तरांच्या बाटल्या तरंगत असल्याचे धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या भागात व्यापारी जहाजांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या मालिकेदरम्यान संयुक्त अरब अमिरातीच्या मालवाहू जहाज जात असताना माईन स्फोट झाला, ज्यामुळे जहाज बुडाल्याचे इराणने म्हटले.
ओमानच्या आखातात अमेरिकन दलांनी इराणशी संबंधित एका जहाजाला नष्ट केले. त्यानंतर काही दिवसांतच हे दृश्य समोर आले आहे. अमेरिकेने या जहाजावर पाळत ठेवल्याचे आरोप आहे. धक्कादायक म्हणजे मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर आयफोन थेट समुद्रात तरंगताना आणि बुडताना दिसत आहेत. यावेळी अनेक जहाज दिसत आहेत. शिवाय जहाज बुडतानाही दिसत आहे.
जहाजांवर लोकही दिसत आहेत. आयफोनच्या किंमती इतक्या जास्त वाढलेल्या असताना थेट समुद्रात बुडताना आयफोन दिसत आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडीओची पडताळणी करता आली नाही. यात बुडालेल्या मालवाहू जहाजाजवळ समुद्रात परफ्यूमच्या बाटल्यांची पाकिटे आणि आयफोनची खोकी तरंगताना दिसत आहेत. काही लोक छोट्या बोटीतून या वस्तू उचलतानाही दिसत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, सिंगापूरच्या ध्वजाखालील जीएफएस प्राईड नावाचे कंटेनर जहाज हा माल दुबईहून घेऊन येत होते. यादरम्यानच मोठा स्फोट झाला. ज्यानंतर जहाज बुडताना दिसले. आग लागल्याने बुधवारी जीएफएस प्राइड हे जहाज बुडाले, अशी माहिती सागरी अधिकाऱ्यांनी दिली. जहाजावरील सर्व 21 कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुरूवातीला अनेकांना हा व्हिडीओ पाहून मोठा धक्का बसला.