अमेरिकेला मोठा दणका, ज्याची भीती तेच घडले, थेट इराणच्या..
इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले. अमेरिकेत निवडणुका तोंडावर आहेत. त्यातच आता होर्मुज खाडीत धक्कादायक घटना घडली. अमेरिकेच्या प्रयत्नांना मोठे अपयश मिळाले. होर्मुज खाडी घडलेल्या घटनेने जगाने मोठा धसका घेतला.

इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडी तूफान चर्चेत आली. अमेरिकेने हल्ले सुरू करताच इराणने तात्काळ होर्मुज खाडी बंद केली. होर्मुज खाडी बंद झाल्याने जग संकटात आले. कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला. कच्च्या तेलाचे भाव वाढले. जागतिक बाजार अस्थिर झाला. इराण आणि अमेरिका युद्धात जग होरपळताना दिसले. भारतात कच्चे तेल होर्मुज खाडीच्या माध्यमातूनच दाखल होते. हीच होर्मुज खाडी युद्धाचे मैदान बनली. अनेक मोठ्या जहाजांवर हल्ले करण्यात आली. भारतीय जहाजांवरही हल्ले करण्यात आले. अमेरिका होर्मुज खाडी आमची असल्याचा दावा करताना दिसली. होर्मुज खाडीवर पूर्णपणे नियंत्रण इराणचे आहे. इराणने युद्धात होर्मुज खाडी बंद केल्याने जग वैतागले होते. ही खाडी खुली करण्यासाठी अमेरिकेने मोठे प्रयत्न केले पण त्यांना यश मिळाले नाही. त्यातच आता पुन्हा होर्मुज खाडीत भडका उठला आहे.
अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या दक्षिण ओमान मार्गावरून प्रवास करणाऱ्या एका मोठ्या तेलवाहू जहाजाची धडक एका नेव्हल माइन अर्थात पाण्याखालील सुरुंग झाली. या धडकेनंतर मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे जहाज हादरले आणि त्याला भीषण आग लागली. या स्फोटानंतर मोठी खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, या जहाजातून सौदी अरेबियाचे 20 लाख बॅरल्स तेल वाहून नेले जात होते. यादरम्यानच खळबळजनक घटना घडली.
अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर हल्ले होऊ लागल्यापासून होर्मुज खाडीतील सुरक्षा धोक्यात आहे. अलीकडेच, आपण अर्धा डझन जहाजांना लक्ष्य केल्याचा दावा इराणने केला आहे. या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांचे संरक्षण करत असल्याचा दावा अमेरिका करत असली तरीही वस्तूस्थिती फार जास्त वेगळी आहे. या मार्गाची सुरक्षा करण्यात अमेरिकेलाही यश मिळाले नाही, हीच वस्तूस्थिती आहे.
होर्मुज खाडीतील प्रवास अजिबात सुरक्षित नाही. त्यात आती ही मोठी घटना घडली. इराणने अमेरिकेसमोर काही अटी ठेवल्या आहेत, जोपर्यंत त्या अटी मान्य केल्या जाणार नाहीत, तोपर्यंत आम्ही होर्मुज खाडी सुरक्षित करणार नसल्याची भूमिका इराणची आहे. इराण जोपर्यंत सुरक्षित मार्ग जहाजांना देत नाही तोपर्यंत होर्मुज खाडीतील प्रवास धोकादायक आहे.
