AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्याची भीती तेच घडले, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, सराफा बाजारात खळबळ, थेट सोने..

इराण आणि अमेरिका युद्धामुळे जग संकटात आले. कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये झपाट्याने वाढ झाली. यादरम्यानच सोन्याचे दर घसरताना दिसले. त्यातच आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठी घोषणा केली.

ज्याची भीती तेच घडले, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, सराफा बाजारात खळबळ, थेट सोने..
Donald Trump and Gold
| Updated on: Oct 10, 2026 | 5:54 PM
Share

अमेरिकेतील निवडणुका तोंडावर आहेत. त्यातच मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष यांनी केलेल्या विधानाचा थेट जागतिक बाजारापेठेवर परिणाम झाला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका घोषणेमुळे सोन्याच्या दरात होणारी घसरण थांबली आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याचे दर सातत्याने घसरताना दिसले. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका घोषणेमुळे सराफा बाजारात खळबळ उडाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट म्हटले की, अमेरिकेतील निवडणुका होऊ पर्यंत कोणत्याही युद्धात अमेरिका भाग घेणार आहे. ही एक अत्यंत मोठी घोषणा म्हणावी लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू आहे. ज्याचा फटका अमेरिकेला बसला. त्यातच आता तोंडावर निवडणुका आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धात उतरणार नसल्याची माहिती दिल्यानंतर जगाने सुटकेचा निश्वास घेतला.

इराण आणि अमेरिका युद्धात जग होरपळले जात आहे. सर्वांनाच या युद्धाचा फटका बसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाने जागतिक बाजारात पुन्हा तेजी बघायला मिळतंय. काही दिवसांपासून कोसळणारे सोने पुन्हा तेजीत आले. सोन्याच्या दरात थपकण 2 हजारांनी वाढ झाली. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 2 हजारांनी वाढ होऊन 148000 वरून 150000 वर पोहोचले.

पुढील काळात भारतात मोठ्या संख्येने सणवार आहेत. त्यावेळी सोन्याची प्रचंड मागणी वाढणार आहे. सोन्याचा दर 155000 वर जाण्याचा अंदाज आहे. फक्त सोनेच नाही तर चांदीच्याही दरात मोठी वाढ होऊ शकते. आयबीजेएच्या दरांनुसार, काल 24 कॅरेटचा सोन्याचा दर 149430 रूपये तोळा होता. 22 कॅरेट सोन्याचा दर 136880 रूपये होता.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे येणाऱ्या दिवसात सोन्याचे भाव अधिक वाढणार हे स्पष्टच आहे. भारतात पुढच्या महिन्यापासून सणांना सुरूवात होईल. यासोबतच लग्नसराईही सुरू होईल, त्यापूर्वीच सोन्याच्या भावात वाढ होणार असल्याचे जवळपास स्पष्टच आहे. इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा फटका भारतालाही बसताना दिसला. भारतात कच्च्या तेलाची मोठी समस्या होती. महागाईही वाढताना दिसली. यादरम्यान भारताच्या मदतीला धावून रशिया आला.

Follow Us
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक