भारताकडून अमेरिकेचा सर्वात मोठा गेम, आकडेवारी थेट 180 अंशाच्या कोणात फिरली, डोनाल्ड ट्रम्प यांना जबर झटका
भारताने अमेरिकेला मोठ झटका दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात भारताने अशी खेळी खेळली ज्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. आकडेवारी थेट 180 अंशाच्या कोणात बदलल्याचं चित्र आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. हे युद्ध थांबवण्याचा अमेरिकेकडून प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना यश आलं नाही. त्यानंतर त्यांनी मोठं पाऊल उचललं. अमेरिकेकडून रशियावर आर्थिक निर्बंध घालण्यात आले. जे देश रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतील त्यांच्यावर देखील अमेरिकेनं टॅरिफ लावण्याची धमकी दिली. मात्र त्याचवेळी भारताने आपली भूमिका स्पष्ट केली होती. आम्हाला जिथून कच्च तेल स्वस्थ मिळेल तिथून आम्ही त्याची खरेदी करू, दरम्यान त्यानंतर आता भारताने अमेरिकेला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. भारताने जागतिक ऊर्जा बाजारात मोठा डाव खेळला आहे. एका महिन्यात संपूर्ण आकडेवराची 180 अंशाच्या कोणात फिरली आहे.
भारताने उचललेल्या या पावलामुळे अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे. आता संयुक्त अरब अमीरात (UAE) भारताचा सर्वात मोठा एलपीजी पुरवठादार देश बनला आहे. हा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेनं भारताच्या एनर्जी इंपोर्ट क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला होता. परंतु आता भारताने पुन्हा एकदा आखाती देशांमधून एलपीची गॅसची आयात वाढवली असून, अमेरिकेचं या क्षेत्रात असलेलं नियंत्रण पूर्णपणे संपलं आहे.
मेरीटाइम इंटलिजेंस फर्म केपलरने दिलेल्या आकडेवारीनुसार आखाती देशांमधून भारतात एलपीजी गॅस घेऊन येणाऱ्या जहाजांच्या संख्येत जबरदस्त वाढ झाली आहे. त्यामुळे भारताला आता एलपीजी गॅससाठी अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नसून अमेरिकेकडून येणाऱ्या एलपीजी गॅसचं प्रमाण हे प्रचंड कमी झालं आहे. गेल्या सहा महिन्यांपासून अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा एलपीजी पुरवठादार देश होता. परंतु आता भारताने अमेरिकेला असा झटका दिला आहे, की अमेरिकेची मक्तेदारी संपुष्ठात आली आहे. आता संयुक्त अरब अमिरात हा भारताला गॅस पुरवठा करणारा सर्वात मोठा देश बनला आहे. हा अमेरिकेसाठी धक्का मानला जात आहे. अमेरिकेची मक्तेदारी संपुष्ठात आली आहे.
