मित्रांसोबतची पार्टी ठरली शेवटची! हल्लेखोरांचा बारमध्ये अंदाधुंद गोळीबार, 27 जण ठार

दक्षिण आफ्रिकेत हल्लेखोरांनी बारमध्ये अंदाधुंद गोळीबार केला आहे. यात 27 जण ठार झाले आहेत. या घटनेने परिसरात खळबल उडाली आहे.

मित्रांसोबतची पार्टी ठरली शेवटची! हल्लेखोरांचा बारमध्ये अंदाधुंद गोळीबार, 27 जण ठार
bar shooting
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 27, 2026 | 2:21 PM

दक्षिण आफ्रिकेच्या गौतेंग प्रांतांत एका बारमध्ये अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात जवळपास 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. जोहान्सबर्गच्या दक्षिण-पश्चिम येथील वेडेला टाऊनशिपजवळ शनिवारी रात्री नऊ वाजता 9.30 वाजता ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेच्या पोलिसांनी रविवारी सांगितलं की, हल्लेखोरांकडे एके-47 रायफल आणि पिस्तूल होते. प्राथमिक माहितीनुसार,हल्लेखोरांनी सुरुवातीला बारच्या बाहेर दारू पित बसलेल्या लोकांवर गोळीबार केला. त्यानंतर बारमध्ये घुसून हल्ला केला. या गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि आपात्कालीन आरोग्य पथक घटनास्थळी पोहोचलं. या आरोग्य पथकाने 27 जणांना मृत घोषित केले. या महिलांचा देखील समावेश आहे. या गोळीबारात 15 जण जखमी झाले. त्यांना वेगवेगळ्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. गोळीबार प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांकडून संशयित हल्लोखोरांचा शोध सुरू आहे. बारवर हल्ला करण्याचा कोणाचा हेतू शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. या गोळीबारामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. दक्षिण आफ्रिकेच्या पोलिसांच्या माहितीनुसार, हा गोळीबार शनिवारी रात्री 9.30 वाजता गौंतेंग प्रांतात झाला.

बारजवळ नेमकं काय घडलं?

पोलिसांनी सांगितलं की, जोहान्सबर्गच्या पश्चिम विभागात ८ बंदूकधारी हल्लोखोरांनी केला. या हल्लेखोरांनी एके-47 रायफलमधून गोळीबार केला. यात 27 जणांचा मृत्यू झाला. रात्री 9.30 वाजता झालेल्या घटनेने एकच खळबळ उडाली. सर्व हल्लेखोरांकडे एके-47 रायफल होते. हल्लेखोरांनी ग्राहकांची झडती घेतली. त्यांचे मोबाईल हिसकावून घेतले. नंतर सर्व जण वाहनांतून फरार झाले. हल्लेखोरांनी पळण्याआधी दोन वाहनांना आग लावली. हल्लेखोरांनी का हल्ला केला, याचा शोध केला सुरू आहे. पोलिसांनी काही संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. गोळीबाराच्या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. स्थानिकांकडून हल्लेखोरांना अटक करून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us