AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Police : चोरांना पकडणार्‍या मुंबई पोलीस दलात कोट्यवधींचा घोटाळा उघडकीस

मुंबई पोलीस दलात साडेसहा कोटींचा घोटाळा झाल्या आरोप आहे. या प्रकरणी 5 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Police : चोरांना पकडणार्‍या मुंबई पोलीस दलात कोट्यवधींचा घोटाळा उघडकीस
| Edited By: | Updated on: Aug 04, 2026 | 8:39 AM
Share

मुंबई पोलीस दलातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई पोलीस दलात कोट्यवधीचया रुपयांचा वेतन घोटाळा उघडकीस आला आहे. पोलीस नसलेल्या व्यक्तींच्या खात्यावर पगाराची रक्कम वर्ग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मार्गातून शासनाच्या सुमारे साडेसहा कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांच्या उत्तर प्रादेशिक विभागाने अंतर्गत चौकशी केली. त्यावेळी काही कर्मचाऱ्यांच्या संशयास्पद नोंदी, अतिरिक्त पगाराचं वाट, पोलीस वेतन सिस्टिममध्ये संशयासपद अपहार झाल्याचे उघड झालं. या मार्गातून जवळपास 6.41 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. हा पैसा कुठे गेला, वेतनाच्या सिस्टिममध्ये ही नोंद कुणी केली, याचा तपास आता केला जाणार आहे.

कोणत्या कालावधीत झाला घोटाळा?

समतानगर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करून तपास सुरू करण्यात आला आहे. हा संपूर्ण घोटाळा डिसेंबर 2019, जानेवारी आणि फेब्रुवारी 2020, जून ते सप्टेंबर 2020 दरम्यान झालेल्या वेतनात हा घोळ झाल्याचा संशय आहे. 2019 ते 2020 मधील वेतन खात्यात तपासात ही तफावत आढळल्याची माहिती मिळतेय. यातून तब्बल ६ कोटी ४१ लाखांचा घोटाळा उघडकीस झाला आहे. वेतन व प्रशासकीय कामकाज पाहणाऱ्या पाच अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशासकीय आणि वेतन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमताने हा अपहार केल्याचा संशय आहे. यात इतर लाभार्थ्यांचाही नावे लवकरच उघडकीस होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पोलीस कर्मचारी नसलेल्यांना पोलीस कर्मचारी दाखवणे, वेतनाच्या खोट्या नोंदी तयार करणे, सरकारी निधीचा गैरवपार करणे या गुन्ह्याचा समावेश आहे. आता गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत या प्रकरणी उत्तर प्रादेशिक विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी उत्तर विभागाच्या 3 चे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या घोटाळ्यात बोगस कर्मचारी नोंदी कशा तयार केल्या गेल्या? या बोगस कर्मचाऱ्यांची पडताळणी कोणी केली? असे प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी