AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडले, पोलिसांनी थेट सांगितले नक्की काय घडले..

Cockroach Janata Party protest Mumbai Police video : कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. मुंबईतही आंदोलन केले जात आहे. यादरम्यान एक व्हिडीओ तूफान व्हायरल झाला. या व्हिडीओसोबतच अत्यंत मोठा दावा करण्यात आला, ज्याने खळबळ उडाली.

पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडले, पोलिसांनी थेट सांगितले नक्की काय घडले..
Cockroach Janata Party protest Mumbai Police video
| Edited By: | Updated on: Jul 24, 2026 | 12:39 PM
Share

नीट पेपरफुटी प्रकरणात मोठे आंदोलन देशभरात सुरू आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. त्यामध्येच कॉकरोच जनता पार्टीने अखेर सरकारचा प्रस्ताव मान्य केला. सरकारसोबत चर्चा करण्यास कॉकरोच जनता पार्टी तयार आहे. या आंदोलनाची व्याप्ती देशभर पसरली आहे. मुंबईतही दादर परिसरात शिवाजी पार्कजवळ विद्यार्थी मोठ्या संख्येने जमत आहेत. नीट परीक्षेसाठी आंदोलन केले जात आहे. मात्र, यादरम्यान धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यानंतर खळबळ उडाली. आमदार रोहित पवार यांनी व्हिडीओ शेअर करत गंभीर आरोप केले. पोलिसांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आली. मुंबईतील दादर परिसरातील आंदोलनात एका सिव्हिल ड्रेसमधील पोलिसाकडून एका आंदोलक महिलेसोबत गैरवर्तन करण्यात आल्याचा दावा करण्यात आला.

आता यानंतर व्हिडीओमध्ये पोलिसाने असे काहीच केले नाही. पोलिसाने तरूण आंदोलकाचे शर्ट पकडले असता ती महिलाचमध्ये आल्याचे स्पष्टीकरण मुंबई पोलिसांकडून देण्यात आले. शिवाय व्हिडीओ पूर्ण बघितला तर नक्की काय घडले आणि पोलिसावर होणारे आरोप खोटे असल्याचे दिसत आहे. व्हायरल व्हिडीओनंतर पोलिसांनी आपली भूमिका मांडली.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप झालेल्या पोलिसाचे नाव बल्लाळ असे आहे. बल्लाळ हे पोलिस हवालदार म्हणून शिवाजी पार्क येथे कार्यरत आहेत. आंदोलन संपल्यानंतर निळ्या रेनकोर्टमधील तरुण पुन्हा मुलांना आंदोलनासाठी बोलत होता असा पोलिसांनी दावा केला आहे. त्यावेळी बल्लाळ हे त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले असताना त्याच्यासोबत असलेली तरुणी अटकाव करण्यासाठी मध्ये गेली असे पोलिसांनी म्हटले.

पोलिसांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, महोदय, सदर व्हिडिओमार्फत आमच्या कर्मचाऱ्याच्या वर्तनाचा अत्यंत बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला जात आहे. जेव्हा सदर अधिकारी एका पुरुष आंदोलकाला पकडून दुसऱ्या दिशेला पाहत होता, तेव्हा एक महिला आंदोलक नकळतपणे मध्ये आली. एक प्रथितयश व्यक्ती म्हणून तुम्ही एखाद्या व्हिडिओच्या आधारे कोणताही अर्थ काढण्यापूर्वी तथ्यांची पडताळणी करणे अपेक्षित असते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व तथ्यांची खात्री केली आहे.

Follow Us
हि शान कोणाची? लालबागच्या राजाची; राजाचं प्रथम दर्शन! व्हिडिओ बघाच
हि शान कोणाची? लालबागच्या राजाची; राजाचं प्रथम दर्शन! संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच
ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल!
BRICS Summit 2026 | ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल! आज पंतप्रधान मोदींसोबत काय होणार चर्चा?
KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
KDMC Doctor Marhan Case | KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?