AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दादरमध्ये आंदोलक महिलेसोबत पोलिसाचं हे वर्तन पाहून तुमच्याही डोक्यात तिडीक जाईल; व्हिडीओ व्हायरल

सीजेपीच्या समर्थनार्थ मुंबईतील दादर इथं आंदोलन सुरू असताना एका पोलीस अधिकाऱ्याने महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहित पवार, वर्षा गायकवाड, हर्षवर्धन सपकाळ यांनी संबंधित अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

दादरमध्ये आंदोलक महिलेसोबत पोलिसाचं हे वर्तन पाहून तुमच्याही डोक्यात तिडीक जाईल; व्हिडीओ व्हायरल
पोलिसाचा व्हिडीओ व्हायरलImage Credit source: Twitter
| Updated on: Jul 24, 2026 | 10:32 AM
Share

नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची धग आता मुंबईतही पोहोचली आहे. मुंबईतील दादर परिसरात असंख्य तरुण-तरुणांनी, विद्यार्थ्यांनी सीजेपीच्या समर्थनार्थ आंदोलन केलं. मात्र याच आंदोलनात एका सिव्हिल ड्रेसमधील पोलिसाकडून एका आंदोलक महिलेसोबत गैरवर्तन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून आता राजकीय नेत्यांनीही त्यावरून तीव्र संताप व्यक्त केला आहे. या व्हिडीओमध्ये सिव्हिल ड्रेसमधील एक पोलीस अधिकारी तावातावाने आंदोलकांसमोर येतो आणि एका महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताना दिसत आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट करत कारवाईची मागणी केली आहे. ‘हा व्हिडिओ बघून डोक्याची तिडीक उठली. कोण आहे नराधम? याच्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत हा किती किळसवाणं कृत्य करतोय. हा पोलीस असेल तर पहिलं याला निलंबित नाही तर पोलीस दलातून बडतर्फ करा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा. एक वेगळी प्रतिष्ठा असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाला लागलेली ही कीड आहे,’ असं त्यांनी लिहिलं आहे.

‘देवेंद्र फडणीस माफी मागा. स्वतःला देवाभाऊ म्हणवून घेणारा, तर दुर्योधन निघाला. दुर्योधनाने सत्तेच्या अहंकारात द्रौपदीचं वस्त्रहरण केलं होतं. देवाभाऊंचे पोलीस इतके मस्तवाल झाले आहेत की ते आपल्या मुलीच्या वयाच्या विद्यार्थीनींचा विनयभंग करत आहेत. आमच्या लेकींच्या अब्रूवर हात टाकणाऱ्या या नराधमांना तात्काळ पोलीस दलातून बडतर्फ करून गजाआड केलं पाहिजे,’ असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय. पोलिसाचा हा व्हिडीओ काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, जितेंद्र आव्हाड यांच्याकडूनही एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.

दुसरीकडे रोहित पवार यांनी राजकीय फायद्यासाठी सोशल मीडियावरील एका व्हिडिओचा विपर्यास करून मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप भाजपच्या नवनाथ बन यांनी केला आहे. ‘वस्तुस्थिती अशी दिसते की, संबंधित पोलीस अधिकारी कोणत्याही महिलेशी गैरवर्तन करतांना दिसत नाहीत. ते निळ्या शर्टमधील व्यक्तीला पकडण्यासाठी धावत गेले होते. हे व्हिडिओच्या सुरूवातीपासून स्पष्ट दिसत आहे. रोहितदादा, तुमच्या राजकीय फायद्यासाठी आणि स्वार्थी राजकारणासाठी मुंबई पोलीसांना बदनाम करू नका. फक्त सनसनाटी निर्माण करण्यापेक्षा तथ्यांची पडताळणी करूनच सार्वजनिक आरोप करायला हवेत. तुमचं हे राजकारण बघून जनतेच्या डोक्यात तिडीक येते हे लक्षात ठेवा. मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचं राजकारण थांबवा आणि व्हिडिओ पुन्हा एकदा नीट डोळे उघडून बघा,’ असं त्यांनी पुढे म्हटलंय. या आरोप-प्रत्यारोपांनंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करण्यात येत असल्याचं कळतंय. या चौकशीअंती नेमकं काय समोर येईल आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच