Fact check: हाफिज सईदला पाकिस्तानच्या कारागृहात दिले विष, ICU मध्ये भर्ती? व्हायरल दाव्याचे सत्य काय?

Hafiz Saeed trends on Twitter,: हाफिज सईदने मुंबई दहशतवादी हल्ल्याची योजना आखली होती. पुलवामा हल्ल्यातील त्याचा सहभागही समोर आला आहे. भारत सरकार अनेक दिवसांपासून त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहे, मात्र अद्यापपर्यंत त्याला यश आलेले नाही.

Fact check: हाफिज सईदला पाकिस्तानच्या कारागृहात दिले विष, ICU मध्ये भर्ती? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
hafiz saeed
Follow us
| Updated on: Apr 09, 2024 | 9:13 AM

लश्कर-ए-तैयबा या अतिरेकी संघटनेचा प्रमुख असलेला हाफिज सईद पाकिस्तानातील कारागृहात आहे. संयुक्त राष्ट्राच्या दबावानंतर टेरर फंडीग प्रकरणात त्याला शिक्षा झाली आहे. आता भारताचा शत्रू आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी हाफिज सईद याला पाकिस्तानातील कारागृहात विष दिल्याची बातमी सोशल मीडियावर सुरु आहे. हाफिज सईद याची प्रकृती गंभीर असून तो अतिदक्षता विभागात दाखल असल्याचे म्हटले जात आहेत. काही जणांना त्याचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. परंतु त्याचा मृत्यू झाला नाही. तो सुरक्षित आहे. पाकिस्तान सरकार किंवा भारत सरकारकडून या बातमीला दुजोरा दिला गेला नाही. यामुळे सोशल मीडियावर हाफिज सईद याला विष दिल्याचा होत असलेला दावा चुकीचा आहे.

काय केला गेला दावा

74 वर्षीय हाफिज सईद पाकिस्तान कारागृहात आहे. त्याच्यावर टेरर फंडिंग प्रकरणाचे गंभीर आरोप आहेत. गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानात असलेले मोस्ट वॉन्टेड अतिरेकी मारले जात आहेत. हे सर्व अतिरेकी भारताच्या मोस्ट वॉन्टेडच्या यादीत होते. त्यात हाफिज सईद याचेही नाव जोडले गेले. सोशल मीडियावरील दाव्यानुसार हाफिज सईद याला अज्ञात लोकांनी विष दिले. त्यानंतर त्याला रक्ताची उलटी झाली. त्याची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले. सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्स हाफिज सईद ट्रेंड करत आहे. परंतु ही बातमी चुकीची आहे. तिला कोणाकडून दुजोरा मिळाला नाही.

हे सुद्धा वाचा

कोण आहे हाफिज सईद?

हाफिज सईद भारताला हवा असणारा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. मुंबईत 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तो मास्टर माइंड आहे. पाकिस्तानातून भारतविरोधी कारवायांमध्ये तो गुंतलेला असतो. त्याच्या प्रत्यर्पणासाठी भारताने पाकिस्तानवर दबावही आणला. परंतु त्यात यश आले नाही. त्याला टेरर फंडिग प्रकरणात अटक करुन पाकिस्तानच्या कारागृहात ठेवले गेले आहे.

काय काय आहे हाफिज सईदवर आरोप

हाफिज सईदने मुंबई दहशतवादी हल्ल्याची योजना आखली होती. पुलवामा हल्ल्यातील त्याचा सहभागही समोर आला आहे. भारत सरकार अनेक दिवसांपासून त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहे, मात्र अद्यापपर्यंत त्याला यश आलेले नाही. हाफिज सईद काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणतो आणि दहशतवादी निधी पुरवण्यात गुंतलेला आहे. एनआयए त्याच्या भूमिकेचाही तपास करत आहे. तो भारतीय एजन्सीच्या रडारवर आहे.

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.