AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माकडांच्या झुंडचा हल्ला, 13 वर्षांच्या मुलीने 15 महिन्यांच्या भाचीचे ‘एलेक्सा’च्या मदतीने वाचवले प्राण

'एलेक्सा' एक व्हाईस कंमाड असणार स्पीकर आहे. तो इंटरनेटच्या माध्यमातून दिलेला टास्क पूर्ण करतो. त्यात हवी ती गाणी लावता येतात. निकिताने कुत्र्यांचे आवाज काढण्याची कंमाड देताच एलेक्साने कुत्र्यांचे आवाज काढले. त्यामुळे माकडांनी पळ काढला आणि तिच्या भाचीचे प्राण वाचले. निकिताच्या या कल्पकतेचे चांगले कौतूक होत आहे. 

माकडांच्या झुंडचा हल्ला, 13 वर्षांच्या मुलीने 15 महिन्यांच्या भाचीचे 'एलेक्सा'च्या मदतीने वाचवले प्राण
निकिताने दिलेल्या कमांडमुळे ऐलेक्साने कुत्र्यांचा आवाज काढला.
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 06, 2024 | 2:18 PM
Share

तंत्रज्ञानामुळे आजकालची मुले स्मार्ट झाली आहेत. ज्येष्ठ अन् युवकांना गॅझेटचा वापर चांगल्या पद्धतीने करता येत नाही. परंतु मुलांकडून स्मार्ट पद्धतीने ते वापरले जातात. उत्तर प्रदेशातील बस्ती शहरातून एक चांगली बातमी आली आहे. बस्ती शहरातील विकास कॉलनीमधील ही घटना आहे. या कॉलनीतील एका घरात १३ वर्षांची निकीता आणि तिची १५ महिन्यांची भाची घरात खेळत होती. त्यावेळी घरात माकडांची झुंड आली. त्या झुंडीने घरातील सामान फेकणे सुरु केले. त्याच खोलीत तिची १५ महिन्यांची भाची खेळत होती. माकडे भाचीवर हल्ला करणार? तोपर्यंत निकिताने डोके चालवले. तिने ‘एलेक्सा’ ला कंमाड दिली. त्यानंतर माकडे घरातून पळाले.

असा घडला प्रकार

निकिता आणि तिच्या भाची एका खोलीत खेळत होते. घरातील मंडळी कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी अचानक माकडाची झुंड आली. त्यानी स्वयंपाकघरातील सामान इकडे-तिकडे फेकण्यास सुरुवात केली. त्याचवेळी 15 महिन्यांची निकिताची ती भाची प्रचंड घाबरली. निकिता माकडांना पाहून भाचीला उठवण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी माकडे त्याकडे वळू लागली. काय करावे, हे निकिताचा सूचत नव्हते. मग अचानक तिचे लक्ष फ्रिजवर पडलेल्या ‘एलेक्सा’कडे गेले.

‘एलेक्सा’ दिली कुत्र्याच्या आवाजाची कंमाड

निकिताचे लक्ष ‘एलेक्सा’कडे जाताच तिच्या डोक्यात कल्पना आली. तिने ‘एलेक्सा’ कुत्र्यांची आवाज काढण्याची कमांड दिली. ‘एलेक्सा’ने कंमाड ऐकताच जोरजोराने कुत्र्यांचा आवाज काढला. माकडांना मात्र कुत्रेच आल्याचा भास झाला. त्यांनी त्या खोलीतून पळ काढला.

काय आहे ‘एलेक्सा’

‘एलेक्सा’ एक व्हाईस कंमाड असणार स्पीकर आहे. तो इंटरनेटच्या माध्यमातून दिलेला टास्क पूर्ण करतो. त्यात हवी ती गाणी लावता येतात. निकिताने कुत्र्यांचे आवाज काढण्याची कंमाड देताच एलेक्साने कुत्र्यांचे आवाज काढले. त्यामुळे माकडांनी पळ काढला आणि तिच्या भाचीचे प्राण वाचले. निकिताच्या या कल्पकतेचे चांगले कौतूक होत आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...