AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवाजी महाराजांची प्रतिमा डाव्या विचारांच्या इतिहासकारांकडून बदलण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीस यांचे विधान!

Devendra Fadnavis News: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत फडणवीसांनी मोठं विधान केले आहे. डाव्या इतिहासकारांनी प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला, असे ते म्हणाले आहेत.

शिवाजी महाराजांची प्रतिमा डाव्या विचारांच्या इतिहासकारांकडून बदलण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीस यांचे विधान!
| Updated on: Sep 30, 2026 | 11:02 PM
Share

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एक वक्तव्य केले आहे. ते आता चर्चेत आले आहे. शिवाजी महाराजांची प्रतिमा डाव्या विचारांच्या इतिहासकारांनी बदलण्याचा प्रयत्न केला. आर्य-अनार्य थेरीत काहीही अर्थ नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काही आव्हाने ही फक्त महाराष्ट्रापुरती नाहीत तर संबध मानव जातीपुढची आहे. जलवायु प्रदुषण हे त्यापैकी एक आहे. कोकणाला दैवी देणगी आहे. कोकणची नैसर्गिक संरचना फक्त महाराष्ट्राचेच नाही तर भारताचे संरक्षण करते. चेरापुंजी नंतर सगळ्यात जास्त पाऊस सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे पडतो. रीव्हर लिंकिंगमध्ये आम्ही सांगली, साताऱ्याचे पाणी मराठवाड्याला घेऊन जाऊ, असं त्यांनी यावेळी सांगितले आहे.

ते म्हणाले की, मी असे मानतो की या देशातील सांस्कृतिक फेरबदल आणि आपण सगळे जे स्वता:ला हिंदु म्हणवून घेतो ते RSS मुळे आहे. संघ नसता तर डाव्या विचारांनी हा देश नष्ट केला असता,असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र देशाची स्टार्टअप राजधानी म्हणून उदयास आले आहे. जिथे ३०,००० हून अधिक स्टार्टअप्स असून ते भारतातील एकूण स्टार्टअप्सच्या १८ टक्के आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

तसेच, युवकांच्या नेतृत्वाखालील संशोधन आणि नवोपक्रम राज्याला जागतिक नवोपक्रम केंद्र बनण्यास मदत करू शकतात, असा दावाही त्यांनी केला. दक्षिण मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स येथे गेट्स फाउंडेशन आणि समग्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘द गव्हर्नन्स चॅलेंज’च्या चौथ्या आवृत्तीत बोलताना फडणवीस म्हणाले की, वर्गखोल्या आणि हॅकेथॉनमध्ये निर्माण झालेल्या कल्पनांपासून ते इनक्यूबेशन, तंत्रज्ञान, बाजारपेठा आणि अंमलबजावणीपर्यंतच्या संपूर्ण साखळीला व्यापणारी एक नवोन्मेष परिसंस्था उभारण्यासाठी सरकार काम करत आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...