प्रियकराचा बाईक्सचा शौक पूर्ण करण्यासाठी घरातील तिजोरी हळूहळू साफ केली, अल्पवयीन मुलीचा प्रताप
आपल्या प्रियकराचे महागडे शौक पूर्ण करण्यासाठी रोज घरातील तिजोरीतून ८५ ते ९० लाखाचे दागिने एका अल्पवयीन तरुणीने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

प्रियकराचे महागडे शौक पुर्ण करण्यासाठी एका अल्पवयीन मुलीने आपल्या घराती आणि नातेवाईकांच्या घरातील दागिने रोज थोडे थोडे चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दागिन्यातून या अल्पवयीन तरुणीने तिच्या प्रियकाला बुलेट- पल्सर अशा बाईक विकत घेण्यासाठी पैसा पुरवल्याचे उघडकीस आल्याने पोलिसांसह तिचे नातेवाईक देखील हैराण झाले आहेत.
उत्तर प्रदेशातील बांदा येथे चोरीचे असे प्रकरण उघडकीस आले आहे की त्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. येथे एका अल्पवयीन तरुणीने तिचा कथित प्रियकरासाठी घरातच रोज सोन्याचे थोडे-थोडे दागिने चोरी करुन तिजोरी रिकामी केल्याचे उघडकीस आले आहे.अनेक महिन्यांपासून हा मुलीचे हे उद्योग सुरु होते. हा तरुण मुलीने दिलेले दागिने विकून त्यातून बुलेट, पल्सरसारख्या बाईक घेऊन गावभर फिरायचा असे उघडकीस आले आहे.
अतर्रा कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हा प्रकार आहे. घरातील मंडळी घरातील महागडे दागिने अचानक गायब होत असल्याने हैराण होते. पोलिसांकडे अखेर तक्रार करण्यात आली. पोलिसांना या प्रकरणात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. सुरुवातीला कोणालाही अंदाज नव्हता की घरातील व्यक्ती दागिने चोरत आहे.
पोलिसांनी घरात लावलेली सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. यात एक मुलगी हातातील काही सामाने घेऊन घराबाहेर जाताना दिसली. पोलिसांनी या मुलीची चौकशी सुरु केली. अखेर पोलिसांच्या उलटसुटल प्रश्नाने गांगरेल्या या मुलीने सर्व गुन्हा सांगून टाकला. आपणे प्रियकरासाठी घरात चोरी केल्याने या मुलीने सांगितल्यानंतर या प्रकरणाचा गुंता सुटला.
घरातील चावीने खोलायची तिजोरी, रोज दागिने चोरायची
या अल्पवयीन मुलीला घरातील तिजोरीच्या चाव्या कुठे ठेवतात याची माहिती होती. याच्यामुळे ताळा न तोडता आराम तिने हळूहळू एकेक दागिना चोरण्यास सुरुवात केली. त्यानंतर हे दागिने ती प्रियकराला देत होती. हे दोघे जण एकत्रच शिकत होते असेही उघडकीस आले आहे. अनेक महिने हा प्रकार चालू होता. हा तरुण या पैशातून महागडे कपडे, मोबाईल आणि बाईक विकत घ्यायचा असे उघडकीस आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी सतेंद्र याला अटक केली असून तो चित्रकूट जिल्ह्यातील रसिन गावचा रहिवासी आहे. आतापर्यंत मुलीने ८५ ते ९० लाथ रुपयांचे दागिने चोरल्याची माहिती उघड झाली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून २७ नग सोने आणि ८ नग चांदीचे दागिने जप्त केले आहेत.
