जगात मोठी खळबळ! अनेक देशांनी घेतले धाड धाड निर्णय, थेट अमेरिकेतील..

नेदरलँड्स आणि फ्रान्सनं मोठ्या प्रमाणात अमेरिकेतून सोन्याचा साठा हलवलाय. त्यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला. ज्याने एकच खळबळ उडाली आहे. जागतिक बाजारात नक्की काय सुरू आहे, असाही सवाल उपस्थित केला जातोय.

जगात मोठी खळबळ! अनेक देशांनी घेतले धाड धाड निर्णय, थेट अमेरिकेतील..
Gold reserves
| Updated on: Sep 06, 2026 | 10:58 PM

युरोपातल्या काही देशांनी अमेरिकेत साठवलेले सोन्याचे साठे हलवायला सुरुवात केली आहे. यामुळे भविष्यात ही एका मोठ्या आर्थिक जागतिक मंदीची चाहूल आहे का. असाही प्रश्न अनेकांना पडलाय. युरोपातले अनेक देश अमेरिका-कॅनडात ठेवलेले सोन्याचे साठे आपापल्या देशात परत नेवू लागले आहेत. ही हालचाल मोठ्या आर्थिक धोक्याची भविष्यवाणी म्हणून नाही, तर सध्याच्या जागतिक अस्थीरतेपोटी उचललेलं पाऊल असल्याचं बँका आणि विश्लेषक सांगत आहेत. नेदरलँड्स आणि फ्रान्सनं मोठ्या प्रमाणात अमेरिकेतून सोन्याचा साठा हलवलाय. त्यापैकी एक मोठा भाग आता लंडनच्या बँकेत ठेवण्यात आला. नेदरलँडनं जवळपास 86 टनं सोनं लंडनला हलवलं. त्यापैकी 59 टन सोन्याची अमेरिकेच्या बाजारात विक्री करुन लंडनमधून खरेदी करण्यात आलं. तर 27 टन सोनं प्रत्यक्ष वाहतुकीनं आणलं गेलं.

अधून-मधून अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये टॅरिफ वॉरवरुन उडणारे खटके, सद्याची जागतिक स्थिती या पार्श्वभूमीवर सोन्याचे साठे आपल्या देशाच्या अधिक जवळ असावेत असंही यामागे कारण दिलं गेलंय. संकटकाळात सोन्याचा साठ्याचा उपयोग केला जातो. मात्र साठा जर परदेशात असेल तर तो तातडीनं आणण्यामागे अनेक राजकीय आणि तांत्रिक अडचणी येतात.

रशिया-युक्रेन युद्दावेळी रशियाचे युरोप आणि अमेरिकेतली सोन्याच्या साठ्यांवर निर्बंध आणले गेले होते. त्या भीतीपोटीही युरोपचे काही देश सोन्याचा साठा हलवू लागलेत. आर्थिक मंदीत सोनं ही सर्वात सुरक्षिक गुंतवणूक मानली जाते. त्यामुळे जगातल्या सर्वात सुरक्षित अशा न्यूयॉर्क आणि लंडनमधील बँकांमध्ये युरोपचे काही देश सोनं साठवतात….मात्र या घटनेमुळे ही भविष्यातील आर्थिक मंदिची चाहूल तर नाही ना., असा प्रश्नही विचारला जातोय

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. मोठे हल्ले केले जात आहेत. त्यातच जगात अस्थिरता पसरली आहे. कच्च्या तेलाचे भाव वाढताना दिसत आहेत. त्यातच तिकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातीलही संघर्ष वाढला आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला केला की, लगेचच जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us