जगातील सर्वात महगडा घटस्फोट, श्रीमंत व्यक्तीची संपत्ती निम्म्यावर

मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळख असलेले अमेझॉनचे (Amazon) संस्थापक जेफ बेजॉस (Jeff Bezos) घटस्फोट घेत आहेत. 25 वर्ष एकत्र राहिल्यानंतर जेफ बेजॉस आणि पत्नी मॅकेन्जी बेजॉस (Mackenzie) दोघे वेगळे होत आहेत. या दोघांनी ट्विटरच्या माध्यमातून सर्व जगाला घटस्फोटाबाबतची (Divorce) माहिती दिली. या दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रिया अमेरिकेतील वॉश्गिंटनमध्ये होत आहे. हा जगातील पहिला घटस्फोट […]

जगातील सर्वात महगडा घटस्फोट, श्रीमंत व्यक्तीची संपत्ती निम्म्यावर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळख असलेले अमेझॉनचे (Amazon) संस्थापक जेफ बेजॉस (Jeff Bezos) घटस्फोट घेत आहेत. 25 वर्ष एकत्र राहिल्यानंतर जेफ बेजॉस आणि पत्नी मॅकेन्जी बेजॉस (Mackenzie) दोघे वेगळे होत आहेत. या दोघांनी ट्विटरच्या माध्यमातून सर्व जगाला घटस्फोटाबाबतची (Divorce) माहिती दिली. या दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रिया अमेरिकेतील वॉश्गिंटनमध्ये होत आहे. हा जगातील पहिला घटस्फोट असेल ज्याची सेटलमेंट किंमत ही सर्वात जास्त असेल. बेजॉस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत.  त्यांचे वार्षिक उत्पन्न 137 बिलियन डॉलर (अंदाजे 9.5 लाख कोटी) आहे. अमेझॉनमध्ये जेफ बेजॉस यांची 16 टक्के भागीदारी आहे.

जेफ बेजॉस आणि पत्नी मॅकेन्जी हे 25 वर्ष एकत्र राहिले. अमेझॉनला मोठे करण्यात जितका वाटा पती बेजॉस यांचा तितकाच मोलाचा वाटा पत्नी मॅकेन्जी यांचाही आहे. जेफ बेजॉसच्या अनेक कंपन्या आहेत, यासोबत अमेरिकेतील  प्रसिद्ध वृत्तपत्र द वॉश्गिंटन पोस्टही (The Washington post) आता जेफ बेजॉसचे आहे.

हे दोघे अमेरिकेच्या अशा राज्यात घटस्फोट घेत आहेत, जिथे नवरा-बायकोने घटस्फोट घेतला, तर पैसे आणि प्रॉपर्टीमध्ये दोघांची समान वाटणी केली जाते. जर असे झाले तर घटस्फोटाच्या प्रक्रियेमध्ये बेजॉस यांची संपत्ती घटू शकते. म्हणजेच, 137 बिलियनवरुन थेट 60 बिलियन डॉलरवर बेजॉस यांची संपत्ती येणार आहे. तसेच घटस्फोटाच्या सेटलमेंटमध्ये 60 बिलियन डॉलर हे मॅकेन्जी यांना मिळणार. यामुळे मॅकेन्जी जगातील सर्वात श्रीमंत महिला होऊ शकते.

बेजॉस आणि मॅकेन्जीने घटस्फोट प्रकरणावर आपले मत व्यक्त केले आहे. आमच्या कुटुंबाला आणि जवळच्या मित्रांना माहित आहे. आम्ही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि यापुढे आम्ही मित्रासारखे राहू, असं मॅकेन्झी आणि बेजॉस यांनी सांगितले.

जेफ आणि मॅकेन्जीला तीन मुलं आणि एक मुलगी आहे. बेजॉस यांचे वय 54 वर्ष आहे, तर मॅकेन्जी यांचे वय 48 वर्ष आहे. या दोघांची न्यूयॉर्कमधील डी. ई. शॉ नावाच्या कंपनीत ओळख झाली होती. यानंतर काही दिवसांनी दोघांनी अमेझॉनची सुरुवात केली. आज ती कंपनी देशातील पहिल्या क्रमांकावर आहे. रिपोर्टनुसार मॅकेन्जी यांनी जरी अर्धा हिस्सा घेतला नसता तरी जगातील हा सर्वात महागडा घटस्फोट ठरु शकतो.

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.