320 वर्षांपासून संग्रहालयात ठेवली आहे ‘ही’ शापित खुर्ची, जो यावर बसला त्याचा झाला मृत्यू

| Updated on: Nov 24, 2022 | 11:26 AM

इंग्लंडच्या थर्क्सच्या संग्रहालयात एक खुर्ची ठेवण्यात आली आहे. जो कोणी या खुर्चीत बसला त्याचा रहस्यमयी मृत्यू झाला आहे.

320 वर्षांपासून संग्रहालयात ठेवली आहे ही शापित खुर्ची, जो यावर बसला त्याचा झाला मृत्यू
हीच ती शापित खुर्ची
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, 18 व्या शतकात थॉमस बस्बी नावाचा माणूस इंग्लंडमधील थर्स्क (Thirsk Cursed chair) येथे राहत होता. त्याचा डॅनियलऑटी नावाचा मित्र  होता. असे सांगण्यात येते की,  हे दोघेही बनावट नाणी बनवण्याचे बेकायदेशीर काम करायचे . डॅनियल हा थॉमसचा चांगला मित्र तर होताच, पण थॉमसने त्याची मुलगी एलिझाबेथशीही लग्न केले होते. त्यानंतर दोघांमधले नाते हे जावई आणि सासरे असे  झाले. पुढे ही मैत्री आणखीनच घट्ट होत गेली. रोज काम संपल्यावर दोघे थिरस्क येथील त्यांच्या आवडत्या बारमध्ये एकत्र बसायचे आणि तिथे भरपूर मद्यपान करायचे.

थॉमस नेहमी त्या बारमध्ये एकाच खुर्चीवर बसायचा, त्यामुळे त्याला एक विशेष आसक्ती होती. बारमध्ये आल्यानंतर त्या खुर्चीत कोणी बसले असेल तर थॉमस त्याच्याशी भांडून खुर्ची रिकामी करायला लावायचा. दुसऱ्यांना बळजबरीने तेथून हटवून तो स्वतः त्यात बसायचा, पण ही खुर्ची पुढे जाऊन अनेकांचे प्राण घेणार होती. याची कोणालाच कल्पना नव्हती.

कथा 1702 मध्ये सुरू होते. एके दिवशी एका बारमध्ये थॉमस आणि डॅनियल यांच्यात कशावरून तरी भांडण झाले. भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. मग डॅनियल थॉमसला चिडवण्यासाठी त्याच्या आवडत्या खुर्चीत बसला. हे पाहून थॉमसला इतका राग आला की त्याने डॅनियलचा खून केला.

हे सुद्धा वाचा

कोणी दिला शाप

पोलिसांनी थॉमसला खुनाच्या आरोपाखाली अटक केली. ज्यानंतर थॉमसला सासऱ्याच्या हत्येच्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ज्या दिवशी थॉमसला फाशी दिली जाणार होती. त्या दिवशी त्याला त्याची शेवटची इच्छा विचारण्यात आली. फाशी देण्यापूर्वी आपली शेवटची इच्छा व्यक्त करताना थॉमसने सांगितले की, थिरस्क येथील बारमध्ये त्याच्या आवडत्या खुर्चीवर बसून त्याला शेवटचे जेवण करायचे आहे. थॉमसची ही इच्छा मान्य करण्यात आली आणि त्याला त्याच बारमध्ये नेण्यात आले. जेवण संपवून तो उभा राहिला आणि बोलू लागला, ‘जो कोणी माझ्या खुर्चीवर बसण्याची हिंमत करेल तो मरेल’. तेव्हापासून ही खुर्ची खरोखरच शापित झाली आहे.

पायलटचा झाला मृत्यू

दुसऱ्या महायुद्धादरम्यान रॉयल एन्फोर्सर्सचे दोन पायलट त्या पबमध्ये आले आणि त्या खुर्चीवर बसले. त्यानंतर ते दोघे पबमधून बाहेर येताच त्यांच्या कारला अपघात झाला आणि दोन्ही पायलटचा मृत्यू झाला. यानंतर या खुर्चीवर जो कोणी बसला त्याचा गूढ मृत्यू झाला. या वारंवार होणाऱ्या मृत्यूमुळे पब मालकाने ही खुर्ची पबच्या गोडाऊनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र इथेही या खुर्चीचा शाप कायम होता.

एकदा गोदामात सामान ठेवायला आलेला कामगार थकला आणि त्या खुर्चीवर बसला. त्यानंतर तासाभराने त्या कामगाराचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर पबच्या मालकाने ही  खुर्ची थर्स्कच्या संग्रहालयाला दान केली. तेव्हापासून ही खुर्ची त्या संग्रहालयात 5 फूट उंचीवर ठेवण्यात आली होती. जेणेकरून चुकूनही या खुर्चीवर कोणी बसू नये.