FIFA WC 2022: इंग्लंड विरुद्धच्या मॅचआधी इराणच्या खेळाडूंनी घेतली मोठी भूमिका

FIFA WC 2022: थेट 'या' कृतीमधून आपल्याच देशातील सरकारला दिला मोठा इशारा

FIFA WC 2022: इंग्लंड विरुद्धच्या मॅचआधी इराणच्या खेळाडूंनी घेतली मोठी भूमिका
iran football teamImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 21, 2022 | 7:49 PM

दोहा: फिफा वर्ल्ड कप 2022 स्पर्धा सुरु होण्याआधी बरेच वाद झाले. आता टुर्नामेंट सुरु झाल्यानंतरही वाद थांबलेले नाहीत. आधी टीव्ही रिपोर्ट्सना अडचण झाली. डेनमार्कच्या एका रिपोर्ट्रला व्हिडिओ बनवण्यापासून थांबवण्यात आलं होतं. एका महिलेसोबत लुटमारीची घटना घडली. आता टुर्नामेंटच्या दुसऱ्या मॅचपासूनच खेळाडूंच नाव वादाशी जोडलं जातय. इराणच्या खेळाडूंनी इंग्लंड विरुद्धच्या मॅचआधी आपल्या देशाच राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला.

इराणच्या संपूर्ण टीमने हे पाऊल उचललं

इराणमध्ये सरकार विरोधात प्रदर्शन चालू आहे. त्याच समर्थन करण्यासाठी इराणच्या संपूर्ण टीमने हे पाऊल उचललं. “देशात सरकार विरोधात प्रदर्शन सुरु आहे. त्या विरोध प्रदर्शनाला पाठिंबा म्हणून राष्ट्रगीत गायचं की, नाही? ते टीम ठरवेल” असं इराणच्या फुटबॉल टीमचा कॅप्टन अलीरेजा जहानबख्शने सांगितलं.

या मॅचआधी इराणच राष्ट्रगीत वाजलं, त्यावेळी खलीफा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये इराणचे 11 खेळाडू गंभीर मुद्रेमध्ये उभे होते. हे सर्वच खेळाडू या दरम्यान भावूक झाले होते.

तीन दिवसांची तिचा मृत्यू झाला

16 सप्टेंबरला इराणच्या पोलीस कोठडीत 22 वर्षाच्या महसा अमिनीचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून इराणमध्ये सरकार विरोधात सातत्याने विरोध प्रदर्शन सुरु आहे. मूळची कुर्द असलेल्या 22 वर्षाच्या अमिनीला तेहरानमध्ये अटक झाली होती. त्यानंतर तीन दिवसांची तिचा मृत्यू झाला. अमिनीवर इराणच्या ड्रेस कोडच उल्लंघन केल्याचा आरोप होता. इराणच्या ड्रेसकोडमध्ये हिजाब अनिवार्य आहे.

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इराणच्या फुटबॉल टीममधील खेळाडूंनी सरकार विरोधात सुरु असलेल्या प्रदर्शनाच समर्थन म्हणून राष्ट्रगीत न गाण्याचा आणि विजयानंतर सेलिब्रेशन न करण्याचा निर्णय घेतला.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.