AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोड खाण्याची इच्छा होतेय पण आरोग्याची चिंता सतावतेय? ट्राय करा शुगर फ्री नारळाच्या लाडूची ‘ही’ खास रेसिपी

तुम्हाला जर गोड पदार्थ खाण्याची इच्छा असेल आणि हेल्दी राहायचे असेल तर नारळाचे लाडू हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही या दोन प्रकारे ते ही शुगर फ्री असलेले नारळाचे लाडू घरी सहज बनवू शकता. चला तर मग झटपट नारळाचे लाडू बनवण्याची रेसिपी जाणून घेऊयात...

गोड खाण्याची इच्छा होतेय पण आरोग्याची चिंता सतावतेय? ट्राय करा शुगर फ्री नारळाच्या लाडूची 'ही' खास रेसिपी
coconut laddus Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Dec 17, 2025 | 3:21 PM
Share

गोड पदार्थांची तीव्र इच्छा आपल्यापैकी प्रत्येकालाच होत असते आणि हे सामान्य आहे. परंतु बदलत्या जीवनशैलीनुसार आणि आरोग्याच्या समस्या लक्षात घेता आज अनेकजण रिफाइंड साखर किंवा जास्त तुपाचा वापर असलेले गोड पदार्थ खात नाही. अशावेळेस गोड खाण्याची तुमची होत असेल तर ती इच्छा पुर्ण करण्यासाठी शुगर फ्री नारळाचे लाडू हा एक उत्तम पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतो.

नारळात भरपूर प्रमाणात फायबर, हेल्दी फॅट आणि खनिजे असतात, जे बराच वेळ आपल्या शरीरात ऊर्जा टिकवून ठेवतात आणि पचन सुधारते. नारळाचे लाडू केवळ चविष्टच नाहीत तर आरोग्यदायी आणि बनवायलाही सोपे आहेत. चला तर मग या दोन प्रकारे नारळाचे लाडू कसे बनवायचे याची सोपी रेसिपी आज आपण जाणून घेऊयात.

खजूर आणि नारळाचे लाडू

साहित्य-

  • 1 कप सुक्या नारळाचा किस
  • 1 कप खजूर (बिया काढलेले)
  • 2 टेबलस्पून काजू किंवा बदाम ( बारीक चिरलेले)
  • 1 टेबलस्पून तूप
  • ½ टीस्पून वेलची पावडर

नारळाचे लाडु बनवण्याची पद्धत-

प्रथम खजूर बारीक चिरून घ्या किंवा फूड प्रोसेसरमध्ये बारीक वाटून पेस्ट बनवा. एका पॅनमध्ये थोडे तूप घाला, खजूर पेस्ट त्यामध्ये टाका आणि मंद आचेवर 2 ते 3 मिनिटे परतून घ्या. त्यानंतर त्यात बारीक चिरलेले काजू किंवा बदाम आणि अर्धे नारळाचा किस टाकून चांगले मिक्स करा आणि मिश्रण थोडे थंड होऊ द्या. आता तयार मिश्रणाचे छोटे लाडुचा आकार देऊन त्यावर नारळाचा बारीक किस टाका. अशापद्धतीने खजूर नारळाचा लाडु तयार आहे.

नारळ आणि दुधाचे लाडू (क्लासिक हेल्दी पर्याय)

साहित्य-

  • 2 कप ताजे नारळाचा किस
  • 1 कप लो-फॅट दूध
  • 3 ते 4 चमचे नारळ साखर
  • 1 टीस्पून वेलची पावडर
  • 1 टेबलस्पून तूप

लाडू बनवण्याची पद्धत-

एका पॅनमध्ये तूप टाका आणि ओल्या नारळाचा किस मधील ओलावा काढून टाकण्यासाठी हलके तळा. त्यानंतर नारळाच्या किसमध्ये दूध टाका आणि मंद आचेवर सतत ढवळत शिजवा. आता मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात दूध पावडर, नारळ साखर आणि वेलची पावडर टाकून मिश्रण पुन्हा चांगले परतवा. आता हे मिश्रण लाडू बनवण्याइतके घट्ट होईपर्यंत शिजवा. त्यानंतर गॅस बंद करा, थंड होऊ द्या आणि नंतर लहान लाडू बनवा.

नारळाचे लाडू केवळ गोड पदार्थांची इच्छा पूर्ण करत नाहीत तर आरोग्यासाठीही खूप फायदे देतात. शुगर फ्री पदार्थ खाणाऱ्यांसाठी खजूराचे लाडू परिपूर्ण आहेत, तर नारळाच्या साखरेचे लाडू पारंपारिक चवीसह निरोगी स्पर्श देतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.