अखेर ठरले! ठिकाण, तारीख आणि वेळही ठरली, इराण आणि अमेरिका युद्धात मोठी घोषणा, थेट..

इराण आणि अमेरिका युद्धात स्थिती गंभीर होत आहे. यादरम्यानच आता इराण अमेरिका युद्धाबाबत अत्यंत मोठी अपडेट पुढे येत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध थांबवण्याची मागणी केली जात आहे. आता युद्धबंदी कराराच्या बैठकीचे ठिकाण आणि वेळही ठरली आहे.

अखेर ठरले! ठिकाण, तारीख आणि वेळही ठरली, इराण आणि अमेरिका युद्धात मोठी घोषणा, थेट..
Iran and America war
| Updated on: Apr 18, 2026 | 9:37 AM

मध्य पूर्वेतील तणाव जगाने बघितला. दोन आठवड्यांकरिता युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. यानंतर इस्लामाबादमध्ये पहिली बैठक झाली. मात्र, काही तास बैठक चालूनही काहीच मार्ग निघू शकला नाही. पुन्हा एकदा चर्चेला सुरूवात झाली. आता काही मुद्द्यांमध्ये सहमती झाल्याची माहिती मिळत आहे. हेच नाही तर आता बैठकीची तारीख आणि ठिकाणही ठरल्याची माहिती मिळत आहे. लवकरात लवकर इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धबंदी करार व्हावेत, ही जगाची इच्छा आहे. पाकिस्तान पहिल्या दिवसापासूनच युद्धात मध्यस्थी करत आहे. या मागे पाकिस्तानचा अत्यंत मोठा उद्देश आहे. एकही देश मदतीकरिता पुढे येत नसल्याने शेवटी अमेरिकेने पाकिस्तानला हाताशी पकडले. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, आता पुन्हा एकदा बैठकीचे ठिकाण ठरले आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे बैठकीसाठी मंच तयार आहे. दोन्ही देशांचे प्रतिनिधि रविवारपर्यंत पाकिस्तानात दाखल होतील

सोमवारी दोन्ही देशांमध्ये औपचारिक चर्चा होऊ शकते. वॉशिंग्टन आणि तेहरानकडून या बैठकीबाबत अजून काही भाष्य करण्यात आले नाही. बऱ्याच मुद्द्यांवर सहमती झाल्याची माहिती मिळत आहे. पडद्याच्या मागे मोठ्या घडामोडी घडत असल्याची माहिती मिळत आहे. इस्लामाबादमध्ये सोमवारी होणाऱ्या बैठकीचीही तयारी सुरू करण्यात आली.

या बैठकीतच युद्धबंदी करार होऊ शकतो, अशी जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. काही तास ही बैठक सुरू राहण्याची शक्यता आहे. या बैठकीकडे जगाच्या नजरा असणार आहेत. पहिली बैठकही इस्लामाबाद येथेच झाली. अनेक तास चर्चा होऊनही काहीच मार्ग निघू शकला नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी अगोदरच स्पष्ट केले की, युद्धबंदी करार अत्यंत जवळ आहेत.

इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेलाही मोठा फटका बसताना दिसत आहे. अमेरिकेमध्ये महागाई वाढली आहे. शिवाय अमेरिकेचे लोक युद्धाच्या विरोधात असल्याचे बघायला मिळत आहे. इराण आणि अमेरिका युद्धात सोमवारी किंवा जास्तीत जास्त मंगळवारी मोठी घोषणा होऊ शकते. यापूर्वीच इराणकडून मोठी घोषणा करण्यात आली. होर्मुज खाडी इराणकडून खुली करण्यात आली आहे.

Follow Us