शेजारच्या देशात 126KM किलोमीटर वेगाने आलं मृत्यूचं संकट, शहरांना धडकलं; शास्त्रज्ञ धावतपळतच सुटले

चीनमध्ये सौडेल वादळाने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे, जे फुजियान आणि झेजियांग प्रांतांना 126 किलोमीटर प्रति तास वेगाने धडकले. या वादळामुळे लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले. हवामान खात्याने उच्चस्तरीय इशारा जारी केला असून, आपत्कालीन तयारी पूर्ण करण्यात आली आहे. शास्त्रज्ञांनी या नैसर्गिक आपत्तीचा तात्काळ अभ्यास सुरू केला आहे.

शेजारच्या देशात 126KM किलोमीटर वेगाने आलं मृत्यूचं संकट, शहरांना धडकलं; शास्त्रज्ञ धावतपळतच सुटले
typhoon saudel china
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 03, 2026 | 2:46 PM

भारतात अनेक ठिकाणी पूरस्थितीसारखी परिस्थिती होती. पण केवळ भारतातच ही स्थिती नव्हती. तर आपल्या शेजारी असलेल्या चीनमध्येही या वर्षी 18 वं वादळ साऊडेल आज सकाळी पूर्व चीनच्या फुजियान प्रांताच्या तटाला तिसऱ्यांदा धडकले. रिजनल वेदर सायन्स ऑब्जर्व्हेटरीच्या मते, वादळाच्या केंद्राच्या जवळ हवेची किमान गती 23 मीटर प्रति सेकंद म्हणजे सुमारे ताशी 86 किलोमीटर वेगाने नोंदवली गेली. हे वादळ आज पहाटे 6 वाजून 30 मिनिटाने आलं. फुजियानच्या झांगझोऊ शहराच्या झांगपू काउंटीच्या तटावर हे वादळ धडकलं. जणू काही मृत्यूचं संकट भासावं असं हे वादळ होतं. हे वादळ येताच शास्त्रज्ञांनी धावतपळतच घटनास्थळी धाव घेतली आणि या वादळाची कारणमिमांसा करण्यास सुरुवात केली.

सिन्हुआ न्यूज एजन्सीच्या रिपोर्टनुसार, 28 ऑगस्टो रोजी साउडेलमध्ये पूर्व चीनच्या झेजियांग प्रांताच्या तटावर दोनदा दस्तक दिली. हवामान खात्याच्या मते, पहिल्यांदाच हे वादळ सकाळी 8 वाजून 5 मिनिटाने तटावर येऊन धडकलं. त्यावेळी केंद्राच्या जवळ हवेची कमाल गती 35 मीटर प्रति सेकंद होती. त्याच्या काही वेळाने सकाळी 9 वाजून 10 मिनिटाने हे वादळ झेजियांगच्या वेनझोउ शहराच्या तटावर दुसऱ्यांदा लँडफॉल झालं. त्यावेळी हवेचा अधिकतम वेग 33 मीटर प्रति सेकंद म्हणजे ताशी 126 किलोमीटर होता. हे वादळ चीनमधील अनेक शहरांना धडकलं असलं तरी या वादळात कोणतीही जीवित हानी झाल्याची नोंद नाहीये.

वादळाचा इशारा

झेजियांग प्रांताने 27 ऑगस्टचं वादळ पाहता आपत्कालीन प्रतिसादाचा स्तर वाढवून लेव्हल -1 केला होता. हा सर्वात उच्च स्तर मानला जातो. वादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्रात एखादी व्यक्ती किंवा जहाज किंवा इतर काही हालचाली राहणार नाही, याची अधिकाऱ्यांनी खबरदारी घेतली. फुजियान प्रांताच्या पूर नियंत्रण मुख्यालयाच्या माहितीनुसार, 28 ऑगस्टच्या सकाळी 7 वाजता सुमारे 247700 लोकांना धोकादायक घटनास्थळावरून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. त्याशिवाय 80 हजाराहून अधिक एमर्जन्सी कामगार आणि 80 हजाराहून अधिक उपकरण कोणत्याही परिस्थितीला नियंत्रित करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले होते.

वॉर्निंग दिली होती

चीनच्या राष्ट्रीय हवामान केंद्राने 28 ऑगस्टच्या सकाळी वादळाचा इशारा दिला होता. हवामान खात्याच्या मते, हे वादळ ताशी 20 ते 25 किलोमीटर वेगाने दक्षिण-पश्चिम दिशेने पुढे सरकेल. त्यानंतर हळूहळू वादळाचा जोर कमी होईल. टायफूनच्या तयारीसाठी झेजियांगने व्यापक पाहणी केली होती. 4 हजाराहून अधिक टेहळणी कर्मचाऱ्यांनी 7200 हू अधिक भू-वैज्ञानिक धोक्यांच्या संभाव्य ठिकाण आणि जोखिम स्थळांमध्ये 19 हजाराहून अधिक वेळ गस्त घातली होती. तर धोका ओळखण्याच्या मदतीसाठी 564 भू-वैज्ञानिक विशेषज्ञांना 73 काउंटिमध्ये पाठवण्यात आलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us