AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nepal Flash Flood : निसर्गाचा चमत्कारच… ढिगाऱ्याखालून निघाली 97 वर्षाची आजी, बाहेर येताच वारंवार म्हणते…

नेपाळच्या जलप्रलयातून 97 वर्षीय गुना माया बोहरा यांचा चमत्कारिक बचाव झाला. चार तास ढिगाऱ्याखाली अडकूनही त्या सुखरूप बाहेर आल्या. वाचल्यानंतरही, "मला पाण्याने का मारलं?" हा त्यांचा वारंवार विचारला जाणारा प्रश्न अनेकांना हेलावून सोडत आहे. त्यांच्या मानसिक धक्क्याचे हे स्वरूप या महापुराची भीषणता दर्शवते.

Nepal Flash Flood : निसर्गाचा चमत्कारच... ढिगाऱ्याखालून निघाली 97 वर्षाची आजी, बाहेर येताच वारंवार म्हणते...
Nepal Flood NewsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 03, 2026 | 12:24 PM
Share

नेपाळच्या जलप्रलयाने अनेकांना हादरवून सोडलं आहे. घर, संसार, मुलंबाळं सर्वच या पुराने हिरावून घेतलं. त्यामुळे अनेकांच्या जगण्याचा आधार तुटला आहे. सात दिवस झाले तरी नेपाळमधील नागरिकांच्या डोळ्यातील अश्रू थांबता थांबत नाहीये. अनेक लोक आपल्या प्रियजनांचा कसोशीने शोध घेत आहेत. अशातच काही चमत्कारासारख्या घटनाही घडताना दिसत आहेत. काही लोक आश्चर्यकारक रित्या वाचल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. एक 97 वर्षाची महिला चार तास ढिगाऱ्याखाली होती. ही महिला वाचली. पण आता ती वारंवार एकच प्रश्न विचारत आहे. तिच्या या प्रश्नाने सर्वच हेलावून गेले आहेत.

गुना माया बोहरा असं या 97 वर्षाच्या महिलेचं नाव आहे. जलप्रलय आल्यानंतर घरेदारे वाहून गेली. केवळ ढिगारा राहिला. या ढिगाऱ्यात ती अडकून पडली होती. नुवाकोटच्या देविघाट येथील नदीच्या किनारी ज्येष्ठ नागरिकांच्या देशभालीसाठी एक केंद्र तयार करण्यात आलं होतं. या केंद्राची पडझड झाली. महिला ग्राऊंड फ्लोअरला होती. ती तळमजल्यावरच ढिगाऱ्यात अडकली होती. चार तास ती या ढिगाऱ्याखाली अडकून होती.

थेट जेसीबीच आणली

महापुराचं पाणी ग्राऊंड फ्लोअर पर्यंत पोहोचलं होतं. जेव्हा पाणी ओसरलं तेव्हा रेस्क्यू टीमने तिथे मदतकार्य सुरू केलं. या तेव्हा ढिगाऱ्याखाली ही 97 वर्षीय महिला असल्याचं दिसून आलं. रेस्क्यू टीमने तिला अतिशय सुखरुपपणे बाहेर काढलं. तिला बाहेर काढण्यासाठी तिचे नातेवाईक जेसीबी घेऊन घटनास्थळी पोहोचले होते. पोलीस आणि सैन्याच्या मदतीने गुना मायाला बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर तिला लगेचच काठमांडूच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

एकच सवाल, उत्तर नाही

दरम्यान, या घटनेनंतर गुना मायाला जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. ती अतिशय कमी बोलत आहे. बोलताना ती थरथरून जात आहे. वारंवार ती एकच प्रश्न विचारत आहे. मला पाण्याने का मारलं? मला पाण्याने का मारलं? असा सवाल त्या वारंवार करत आहे. तिच्या या सवालाचं कुणाकडेच उत्तर नाही. सर्व अवाक होऊन तिच्याकडे बघत आहेत.

दरम्यान, नेपाळच्या महापुरात आतापर्यंत 1,243 लोकांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोक बेपत्ता आहेत. बेपत्ता लोकांचा अनेक ठिकाणी शोध घेतला जात आहे. कडे कपारी, सुरुंगांमध्ये डेडबॉडी सापडते का? याचा शोध घेतला जात आहे. तर या महापुरामुळे तिबेटमधील 100 लोक बेपत्ता आहेत.

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,