Russia Ukraine War Video: कोण म्हणतं पुतीनचं हेलिकॉप्टर पडत नाही? यूक्रेनच्या मिसाईलचा हा निशाणा तरी बघा !

यूक्रेनमधील (Russia Ukraine War Video) एक व्हिडीओ आता समोर येत आहे. त्यामध्ये रशियाचं हेलिकॉप्टर यूक्रेननं पाडलं आहे. यानिमित्तानं यूक्रेन देखील रशियाला आक्रमक पणे उत्तर देत असल्याचं समोर येतंय.

Russia Ukraine War Video: कोण म्हणतं पुतीनचं हेलिकॉप्टर पडत नाही? यूक्रेनच्या मिसाईलचा हा निशाणा तरी बघा !
यूक्रेननं रशियाचं हेलिकॉप्टर पाडलं
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 4:01 PM

नवी दिल्ली: रशिया (Russia) आणि यूक्रेन (Ukraine) यांच्यात दहाव्या दिवशी देखील युद्ध सुरु आहे. दहाव्या दिवशी रशियाच्या टार्गेटवर बुचा आणि इतर शहरं आहेत. यूक्रेनमधील (Russia Ukraine War Video) एक व्हिडीओ आता समोर येत आहे. त्यामध्ये रशियाचं हेलिकॉप्टर यूक्रेननं पाडलं आहे. यानिमित्तानं यूक्रेन देखील रशियाला आक्रमक पणे उत्तर देत असल्याचं समोर येतंय. रशियानं यूक्रेनविरुद्ध युद्ध सुरु केल्यानंतर आतापर्यंत रशिया आक्रमक भूमिकेत पाहायला मिळाला. रशियानं यूक्रेनची अनेक शहरं बेचिराख केल्याचं समोर आलं. रशियाच्या टार्गेटवर सध्या बुचा शहर असल्याचं समोर येतंय. दुसरीकडे परदेशी नागरिकांच्या सुरक्षित सुटकेसाठी युद्ध विराम जारी करण्यात आला आहे. या दरम्यान रशियाचं हेलिकॉप्टर यूक्रेननं पाडल्याचा व्हिडीओ समोर आलाय. यामुळं यूक्रेन देखील रशिया ठोस प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येतंय.

पाहा व्हिडीओ:

रशियाच्या 10 हजार सैनिकांना मारलं, यूक्रेनचा दावा

रशिया यूक्रेनची अनेक शहर उद्धवस्त करत आहे. रशियाकडून यूक्रेनच्या एका मागे एक शहरांना बेचिराख करण्याचं काम सुरु आहे. रशियन सैन्य आक्रमक असलं तरी त्यांना देखील नुकसान होतं आहे. यूक्रेनच्या सैन्यानं जारी केलेल्या माहितीनुसार 10 हजार रशियन सैनिक मारले गेले आहेत. आतापर्यंत रशियानं शस्त्रास्त्र देखील मोठ्या प्रमाणावर नष्ट करण्यात आली आहेत. 40 हेलिकॉप्टर्स, 269 टँक, 39 मिलट्री विमान, 60 इंधन टँक नष्ट करण्यात अल्याचा दावा यूक्रेनच्या सैनिकांकडून करण्यात आला आहे.

24 फेब्रुवारीपासून युद्ध सुरु

रशियन सैन्यानं 24 फेब्रुवारीपासून युक्रेनवर हल्ला सुरु केला आहे. रशियानं यापूर्वी यूक्रेनला घेरण्याची तयारी सुरु केली होती. यावर यूक्रेन वारंवार चिंता व्यक्त केली होती. युद्धाच्या दहा दिवसांमध्ये दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरु झाल्या होत्या. त्या चर्चेअंती दोन्ही देशांनी युद्धविरामावर शिक्कामोर्तब केलं आहे. यूक्रेनमध्ये अडकलेले परकीय नागरिक सुरक्षितपणे बाहेर पडावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यूक्रेननं ला नाटोनं नो फ्लाय झोन करता नकार दिला होता. यानंतर यूक्रेननं त्याचा निषेध नोंदवला आहे.

इतर बातम्या:

Russia Ukraine War Live : रशियाकडून युक्रेनमध्ये युद्धविराम, परदेशी नागरिकांना मायदेशी परतण्यासाठी निर्णय

युक्रेनमधून परतलेल्या MBBS च्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, भारतात इंटर्नशिप करण्याची परवानगी!

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.