सर्वात मोठी बातमी! आज संपूर्ण जगाचा नकाशा बदलणार; संयुक्त राष्ट्रात मतदान होणार!

आज संयुक्त राष्ट्रांत जगाच्या नकाशात बदल करण्यावर मतदान होणार आहे. पारंपारिक मर्केटर नकाशामुळे आफ्रिकेचा आकार लहान दिसतो, ही त्रुटी दूर करण्यासाठी टोगोने नवा प्रस्ताव मांडला आहे. या मंजुरीमुळे शाळा, तंत्रज्ञान आणि सरकारी कामकाजातील नकाशा बदलतील, ज्यामुळे जगाचा चेहरामोहरा कायमचा बदलू शकतो.

सर्वात मोठी बातमी! आज संपूर्ण जगाचा नकाशा बदलणार; संयुक्त राष्ट्रात मतदान होणार!
world map
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 04, 2026 | 4:23 PM

जगाचा चेहरामोहरा आज कायमस्वरुपी बदलणार आहे. आज संयुक्त राष्ट्र महासभेत एका खास प्रस्तावावर मतदान होणार आहे. जगात गेल्या अनेक वर्षापासून पारंपारिक मर्केटर नकाशा वापरला जात आहे. मात्र आफ्रिकेचा आकार योग्य पद्धतीने दिसेल अशा पद्धतीने नवीन नकाशा आणायचा असल्याने हा प्रस्ताव आणण्यात आला आहे. हा प्रस्ताव आफ्रिकन देश टोगोने सादर केला आहे. आफ्रिकेच्या इतर 54 सदस्य देशांसहीत अनेक देशांनी या नव्या नकाशाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हा नकाशा मंजूर झाल्यावर जगाचा संपूर्ण चेहरामोहराच बदलणार आहे.

खरे तर संयुक्त राष्ट्राला अशा प्रकारचे प्रस्ताव लागू करण्यासाठी कायद्याची गरज भासत नाही. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास याचा परिणाम थेट शाळांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या नकाशावर आणि दैनंदिन आयुष्यताील तांत्रिक गोष्टींवर पडणार आहे. याचं कारण म्हणजे शिक्षण, तंत्रज्ञान आणि सरकारी कामकाजात या पारंपारिक मर्केटर नकाशाचा भरपूर वापर होतो.

सध्याच्या नकाशातील त्रुटी काय?

मर्केटर नकाशा 1569 मध्ये फ्लेमिश नक्शानवीस जेरार्डस मर्केट यांनी तयार केला होता. नावाड्यांना समुद्राचा मार्ग शोधण्यास मदत व्हावी हा त्यामागचा हेतू होता. जवळपास 50 वर्षापासून सर्वाधिक वापर होणारा हा जगातील नकाशांपैकी एक आहे. पण हा नकाशा बनवण्याच्या पद्धतीत एक समस्या आहे. या नकाशात भूमध्य रेषेजवळील परिसराचे असली आकार खूप छोटे दिसतात. तर उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या जवळचे परिसर नको तेवढे मोठे दिसत आहेत.

नकाशा सुधारण्याचं अभियान

द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, #CorrectTheMap नावाचं एक कॅम्पेन सुरू आहे. अमेरिका, चीन, भारत, जापान, मेक्सिको आणि यूरोप आदी देशांचा मोठा हिस्सा एकत्र केला तरी आफ्रिकाची काही जमीन उरेल, असं या कॅम्पेनमध्ये म्हटलं आहे. एवढा अवाढव्य भूखंड असतानाही नकाशामध्ये मात्र आफ्रिकेला खूप छोटं दाखवलं जातं. या कॅम्पेनवर आतापर्यंत 11 हजाराहून अधिक लोकांनी सह्या केल्या आहेत. आफ्रिकन संघाने ऑगस्ट 2025मध्ये या कॅम्पेनला सपोर्ट केला होता. त्यानंतर टोगोने त्याची जबाबदारी शिरावर घेतली होती.

पश्चिमेकडील देशांची ताकद

मर्केटर नकाशात पाश्चिमात्य देशांचा विचार आणि जुना दृष्टीकोण दिसून येत असल्याचं इतिहासकार आणि भूगोल तज्ज्ञ सांगतात. काही लोकांनी यासाठी कार्टोग्राफिक कॉलोनियलिज्म असा शब्द वापरला आहे. या नकाशामुळे जगातील इतर देशांच्या ताकदीवरही परिणाम केला आहे. या नकाशात ग्लोबल साऊथ म्हणजे आफ्रिका, आशिया आणि दुसरे विकासशील देशांचा भौगोलिक आकार छोटा दिसत आहे. तर उत्तर गोलार्धातील देशांचा आकार सर्वात मोठा दाखवण्यात आला आहे. त्यासोबतच भूमध्य रेषेवरील देशांचा आकार छोटा दिसत असल्याचंही काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us