हा नुसता माज नाही तर… अमेरिकेतला तिरंग्याचा तो व्हिडीओ व्हायरल, भारतीय लोकांमध्ये तीव्र संताप, थेट..
न्यूयॉर्कमधील एक थक्क करणारा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून भारतीय लोक संताप व्यक्त करताना दिसत आहेत. भारताच्या ध्वजासोबत असे काही करण्यात आले की, ज्यानंतर प्रचंड भारतीय लोक संतापले आहेत.

न्यूयॉर्कमधील व्हिडीओ पाहून तुमच्या डोक्यात राग गेल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या एका कार्यक्रमाच्या स्थळाजवळ निदर्शकांनी गोंधल घातला. एखाद्या व्यक्तीचा विरोध करणे ठीक आहे, तसा अधिकारही आहे. पण चक्क भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान करण्यात आला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. फक्त हेच नाही तर अजून काही लोक भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान करत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय लोकांमध्ये प्रचंड संताप बघायला मिळतोय. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे यावर कडक शब्दांत टीका केली.
किरेन रिजिजू यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, लक्ष देऊन ऐका… आमच्या ध्वजाचा आणि माझ्या देशाचा अपमान करू नका… तुम्हाला याची मोठी किंमत मोजावी लागेल… यादरम्यान त्यांनी न्यूयॉर्कमधील व्हिडीओही शेअर केला. न्यूयॉर्कमधील ‘मॅडिसन स्क्वेअर गार्डनबाहेर एक निदर्शक भारतीय ध्वजाचा अनादर करताना दिसत आहे, तर इतर लोक खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देत आहेत.
खलिस्तानानी समर्थकांकडून ही निर्देशने केली जात होती. काही लोक उपस्थित दिसत आहेत. खलिस्तानचे झेंडेही त्यांच्या हातात दिसत आहेत. मात्र, भारताविरोधात घोषणाबाजी करत त्यांच्याकडून भारतीय ध्वजाचा अपमान केला जात होता. मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील इन्फोसिस थिएटर येथे भारतीय अमेरिकन समुदायातील 6000 हून अधिक सदस्य आणि विविध धर्मांच्या नेत्यांना संबोधित करताना भागवत यांनी विविधतेचा स्वीकार करण्याचे आवाहन केले.
We always said, you have freedom to criticize RSS, BJP or Govt. but don't abuse our nation.
ध्यान से सुनें.. हमारे झंडे और मेरे देश का अपमान मत करो। यह तुम्हें बहुत ज़्यादा महंगा पड़ेगा। pic.twitter.com/THH2kT49yc
— Kiren Rijiju (@KirenRijiju) August 30, 2026
खलिस्तानी समर्थक ही गेल्या काही दिवसांपासून भारताची डोकेदुखी ठरली आहे. त्यातच आता विदेशातही त्यांच्याकडून निर्देशने केली जात आहेत. भारत सरकारकडून खलिस्तानी विरोधात कडक भूमिका घेतली जात आहे. त्यातच आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. एक भारतीय म्हणून प्रत्येकजण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर संताप व्यक्त करताना दिसत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत अनेकजण राग व्यक्त करताना दिसत आहेत. त्यातच नरेंद्र मोदी यांच्या मंत्र्याने आता थेट इशाराच या व्हायरल व्हिडीओनंतर दिला.