भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू, होर्मुज खाडीत भयंकर स्थिती, इराणवर जगाचा संताप, थेट युएईने..

इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला आहे. त्यातच भारतीय कर्मचारी असलेल्या जहाजावर हल्ला करण्यात आला. ज्यात एक कर्मचारी ठार झाला तर इतर आठ जण गंभीर जखमी आहेत. यादरम्यानच जगभरातून इराणच्या या हल्ल्याचा निषेध केला जात आहे.

भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू, होर्मुज खाडीत भयंकर स्थिती, इराणवर जगाचा संताप, थेट युएईने..
Attack on ship Hormuz
| Updated on: Jul 14, 2026 | 10:29 AM

इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला आहे. मोठे हल्ले केले जात आहेत. ज्यामुळे आखाती देश पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. होर्मुज खाडीत जहाजांना टार्गेट करत हल्ले केले जात आहेत. भारतीय कर्मचारी असलेल्या जहाजावर मोठा हल्ला होर्मुज खाडीत झाला. त्यात एका कर्मचाऱ्याचा जीव गेला. यासोबतच काहीजण गंभीर जखमी आहेत. भारताने या हल्ल्यानंतर कडक शब्दात सुनावले. असे हल्ले सहन केली जाणार नसल्याचेही भारताने म्हटले. यादरम्यानच आता संयुक्त अरब अमिरातीने याचा निषेध केला. आंतरराष्ट्रीय कायद्याचे गंभीर उल्लंघन अजिबात सहन करणार नसल्याचे युएईने ठणकावले. युएईच्या रक्षा मंत्रालयाने एक निवेदन जारी केले. त्यांच्या निवेदनात त्यांनी स्पष्ट म्हटले की, निर्लज्ज हल्ला..

या हल्ल्यात जहाजावरील एक कर्मचाऱ्याचा जीव गेला आणि आठ जण जखमी आहेत. नागरिक आणि रहिवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तसेच या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचा पूर्ण अधिकार ते राखून ठेवते. अल जजीराच्या रिपोर्टनुसार, ओमान खाडीजवळ होर्मुज खाडीत मोम्बासा नावाच्या तेलवाहू जहाजावर हल्ला करण्यात आला.

या जहाजात भारतीय कर्मचारी होते. एका भारतीय कर्मचाऱ्याचा हल्ल्यात जीव गेला तर आठ जण जखमी आहेत. या हल्ल्याचा निषेध आणि संताप जगभरातून व्यक्त केला जात आहे. मात्र, यावर इराणने भाष्य करणे टाळले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढलेल्या तणावात चिंता जाहीर केली. या बिघडलेल्या स्थितीचा परिणाम जगाला भोगावा लागेल, असे त्यांनी म्हटले.

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष काही दिवसांपूर्वी थांबला होता. आता पुन्हा एकदा परिस्थिती तणावात आहे. मोठे हल्ले अमेरिकेकडून इराणवर केली जात आहेत. स्थिती गंभीर आहे. होर्मुज खाडी इराणने बंद केली. जग तणावात आहे. पुन्हा एकदा होर्मुज खाडीत जहाजांवर हल्ले होत आहेत. इराण आणि अमेरिका युद्ध पेटल्याने जागतिक बाजाराज कच्च्या तेलाचे भाव भडकले आहेत.

Follow Us