मोठी बातमी! अमेरिकेचा इराणवर मोठा हल्ला, युद्ध भडकले, अमेरिकेचा दावा, थेट..

इराण आणि अमेरिका युद्ध थांबायचे तर त्यांच्यातील तणाव वाढला आहे. इराणकडून अमेरिकेला मोठा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर इराण आता पुन्हा आक्रमक झाले. थेट अमेरिकेच्या लष्कर तळांवर हल्ला करण्यात आला. यादरम्यानच इराणकडून मोठा दावा करण्यात आला.

मोठी बातमी! अमेरिकेचा इराणवर मोठा हल्ला, युद्ध भडकले, अमेरिकेचा दावा, थेट..
US attack
| Updated on: Jun 03, 2026 | 9:04 AM

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध वाढत आहे. तीन महिन्यापेक्षा अधिक काळापासून युद्ध सुरू आहे. ऊर्जेचे मोठे संकट आहे. जागतिक बाजार अस्थिर झाला. जग एका वेगळ्या संकटात आहे. त्यामध्येच पुन्हा एकदा तणाव वाढला. इराणने अमेरिकेच्या लष्कर तळ असलेल्या ठिकाणांवर हल्ला केला. त्यानंतर अमेरिकेने थेट इराणच्या केशम बेटवर मोठा हल्ला केला. हा हवाई हल्ला केल्याचे सांगितले जाते. इराणने केलेला हल्ला हवेतच अमेरिकेने रोखला. बॅलिस्टिक मिसाईल इराणने अमेरिकेच्या लष्कर तळांवर टाकली. इराणचा हा हल्ला अयशस्वी ठरला. बहरीन एअरबेसवर इराणने केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकी एअर डिफेंस सिस्टमने तात्काळ ही हल्ले रोखली. यादरम्यानच इराणी लष्कराने सरकारी मीडियाला बोलताना अमेरिकेला मोठा इशारा दिला. त्यांनी म्हटले की, आम्ही अगोदरच इशारा दिला होता की, आमच्या विरोधात कोणतीही आक्रमक कारवाई आम्ही सहन करणार नाहीत.

आमचे उत्तर खूप वेगळे आणि फार जास्त गंभीर असेल.रात्रीच आम्ही जे बोललो ते करून दाखवले. इराणी लष्कराने दावा केला की, त्यांनी अमेरिकेच्या एअरबेसवर मोठा हल्ला केला. अमेरिकेच्या नाैसेनाच्या पाच मोठ्या मुख्यालयांवर आणि एका अमेरिकेच्या एअर बेसवर मोठा आणि यशस्वी हल्ला केला. मात्र, इराणचा हा दावा खोटा असल्याने अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने म्हटले.

अमेरिकेने म्हटले की, इराणने केलेले हल्ले रोखण्यात आम्हाला यश आले. इराणकडून करण्यात आलेले सर्व हल्ले अयशस्वी ठरल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. एक तर त्यांचा निशाणा चुकला तर दुसरीकडे आम्ही त्यांची हल्ले हवेत रोखली. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. युद्धविरामाची चर्चा सुरू असतानाच पुन्हा एकदा तणाव वाढला.

इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडी बंद आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने तेल पुरवठा विस्कळीत झाला. भारतासह अनेक तेलांचे जहाज होर्मुज खाडीत अडकली आहेत. यादरम्यानच्या काळात भारताचा जवळचा मित्र रशिया भारताकरिता धावला. रशियाकडून भारतात कच्च्या तेलाचा पुरवठा केला जात आहे.

Follow Us