AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणचा 2 देशांमध्ये मोठा हल्ला, ज्याची भीती तेच घडले, जगात खळबळ, थेट..

इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. इराणकडून मोठे हल्ले करण्यात आली. दोन देश इराणच्या निशाण्यावर आहेत. इराण आणि अमेरिका युद्ध थांबावे, ही जगाची इच्छा असतानाच पुन्हा तणाव वाढला आहे.

इराणचा 2 देशांमध्ये मोठा हल्ला, ज्याची भीती तेच घडले, जगात खळबळ, थेट..
Bahrain and Kuwait attacks
| Updated on: Jun 03, 2026 | 8:47 AM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम शांतता करार चर्चा सुरू आहे. मात्र, आता यात मोठी ठिंगणी पडलीये. युद्ध थांबायचे सोडून पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. इस्त्रायल सतत हल्ले करत असल्याने आता इराण पेटून उठला. अमेरिकेने इस्त्रायलला हल्ले थांबवण्यास सांगितले. मात्र, ते त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याने इराण आक्रमक झाला. इराणकडून कुवेत, बहरीन आणि अमेरिकेच्या लष्कर तळांवर मोठी हल्ले करण्यात आली. ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी ही हल्ले इराणकडून करण्यात आली. ज्यामुळे आता परिस्थिती अधिक चिघळल्याचे बघायला मिळतंय. त्यानंतर अमेरिकेच्या लष्कराने प्रतिउत्तर म्हणून इराणच्या केशम बेट आणि इतर काही तळांवर हल्ला केल्याचे सांगितले जाते. मध्य पूर्वेत शांतता व्हावी, ही जगाची इच्छा असताना प्रत्यक्षात उलटेच घडत आहे. तणाव कमी व्हायचा तर अधिक वाढत आहे.

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने एक निवेदन जारी केले. त्यात त्यांनी म्हले की, तेहरानने ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले.पण आम्ही त्यांचे हे हल्ले अयशस्वी केले. हवेतच ती क्षेपणास्त्र नष्ट केली. इराणची कुवेतवर डागलेली क्षेपणास्त्रे एकतर लक्ष्यापासून चुकली, त्यानंतर आम्ही काही हवेतच नष्ट केली. बहरीनची तीन डागलेली क्षेपणास्त्रे देखील अमेरिका आणि बहरीनच्या हवाई संरक्षण प्रणालीद्वारे रोखण्यात आली.

इराणने थेट एकाच वेळी दोन देशांवर हल्ला केला, ज्याने एकच खळबळ उडाली. परिस्थिती भयंकर असताना इराण माघार घेत नाही. काही देश या युद्धात अमेरिकेसह इस्त्रायलला मदत करत असल्याने इराणचा संताप बघायला मिळत आहे. तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून होर्मुज खाडी बंद आहे.

हल्ल्यानंतर कुवेतमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला. लोकांना सुरक्षितस्थळी राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात.  कुवेती लष्कराने एक्सवर पोस्ट करत लिहिले आहे की, कुवेती हवाई संरक्षण प्रणाली सध्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांचा सामना करत आहे. जर स्फोटांचे मोठे आवाज ऐकू आले तर ते हवाई संरक्षण प्रणालीने हल्ले रोखल्याचा परिणाम आहे, असे म्हटले. मात्र, तणाव पुन्हा एकदा वाढला आहे.

Follow Us
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान